हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ भाग घेणार आहे. ऑलम्पिक परिषदेनं जर क्रिकेटचा ऑलम्पिक स्पर्धेत समावेश केला तर लॉस अँजलिसमध्ये २०२८ साली होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ (महिला आणि पुरूष) पाठविण्यात येतील असा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.
शुक्रवारी बीसीसीआयच्या अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑलिम्पिकमध्ये संघाच्या खेळाचा काय परिणाम होईल, हे बोर्ड परिषदेने बैठकीनंतर सांगितले आहे, याचा त्यांच्या स्वायत्ततेवर कसा परिणाम होईल हे त्यांना प्रथम कळेल. ऑलिम्पिकमध्ये खेळण्यामुळे आमच्या स्वायत्ततेवर परिणाम होत नसेल तर लॉस एंजेलिसमध्ये 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पुरुष व महिला क्रिकेट संघ सहभागी होतील, तर महिला संघ पुढील वर्षी बर्मिंघम येथे राष्ट्रकुल स्पर्धेतही खेळेल.
याशिवाय २०२१ साली मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. नुकतंच बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.