इंडियन आयडॉल १२ नव्या वादाच्या भोवऱ्यात; पवनदीप राजनवर अन्याय करीत असल्याचा चाहत्यांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कधीकाळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो म्हणून ओळखला जाणार इंडियन आयडॉल आजकाल अत्याधिक नावडत्या शोच्या यादीत येऊ लागला आहे. सध्या सुरु असलेल्या सीजन १२चा स्पर्धक पवनदीप राजन याचा आवाज लोकांना खूप भावतो. यामुळे त्याचे चाहते किमान त्याचे गाणे ऐकण्यासाठी का होईना हा शो पाहतात. अलीकडेच शोच्या एका भागात हिमेश रेशमियाला ट्रिब्युट दिले होते. यादरम्यान इंडियन आयडॉल १२च्या स्पर्धकांनी हिमेशच्या सुपरहिट गाण्यांचा सूर धरला होता. दरम्यान प्रत्येक स्पर्धकाने हिमेशची दोन-तीन गाणी गायली. मात्र पवनदीपच्या बाबतीत काही भलतेच घडताना दिसले.

https://www.instagram.com/tv/CQIKLyEK9gA/?utm_source=ig_web_copy_link

इंडियन आयडॉल १२च्या मागील भागात पवनदीपने फक्त एकच गाणे गायले. पवनदीपने सलमान खानवर चित्रित झालेले अत्यंत लोकप्रिय गाणे तेरे नाम गायले होते. यावरूनच चाहत्यांनी इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांना धारेवर घेतले आहे. त्याच्या चाहत्यांचे असे म्हणणे आहे कि, इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांनी मुद्दामून पवनदीपच्या परफॉर्मन्सला कट क्रॉप केले आहे.

म्हणून त्याचे फक्त एकच गाणे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर निर्मात्यांनी पवनदीप राजनच्या गाण्यानंतर दिल्या जाणाऱ्या कमेंट्सदेखील कट केल्याचे पहायला मिळाले. मागील भागात परीक्षक, पवनदीप राजनचे कौतुक करतानादेखील दिसले नाहीत. यामुळे इंडियन आयडॉल १२चा हा एपिसोड ऑन एअर झाल्यानंतर निर्माते फॅन्सच्या निशाण्यावर आल्याचे दिसले आहे.

दरम्यान पवनदीप राजनला ३ मिनिटांच्या जागी फक्त ९० सेकंदच गाण्यासाठी दिले गेले. यामुळे वैतागलेल्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा संताप व्यक्त करताना एका युजरने म्हटले की, या लोकांना हे माहित नाही की पवनदीप राजनमुळेच इंडियन आयडॉल १२ चालत आहे. बाकी सर्व सिंगर्स तर ओरडत असतात नाहीतर किंचाळत असतात.

तर अन्य एका युजरने लिहिले की, इंडियन आयडॉल १२ वाले तुम्ही प्रत्येकवेळी बिझनेस केला नाही पाहिजे. ज्या व्यक्तीमुळे शोला यश मिळत आहे, किमान कमीत कमी त्याचा तरी तुम्ही आदर करायला पाहिजे. तसेही गेल्या अनेक आठवड्यांपासून सातत्याने इंडियन आयडॉलचा १२वा सीझन वादाच्या भोवऱ्यात फिरून फिरून सारखा अडकताना दिसतो आहे. त्यामुळे यावेळीदेखील निर्मात्यांच्या अक्क्लेसह शोच्या टीआरपीपर्यंत सगळ्या गोष्टींचा चाहते फडशा पाडताना दिसत आहेत.