किंचाळणे, ओरडणे म्हणजे गाणे नव्हे..आधी त्यांना बाहेर काढा; ‘इंडियन आयडॉल १२’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

0
55
Indian Idol 12
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडॉल १२ या सिंगिंग रिऍलिटी शो चा अक्षरशः बँड वाजला आहे. हा शो एकावेळी अत्यंत लोकप्रिय शोजपैकी एक होता. मात्र आज या शो चा टीआरपी पूर्ण ढासळला आहे. अलीकडे ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’ दरम्यान शोवर टीकांचा पाऊस पडला होता. तर आता या शोच्या दोन स्पर्धकांना शोमधून बाहेर काढा, अशी मागणी सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून होत आहे. हे दोन स्पर्धक म्हणजे मोहम्मद दानिश आणि शन्मुखप्रिया. आता दानिश व शन्मुख प्रिया यांच्यामुळे ‘इंडियन आयडल १२’वर नवा वाद ओढवला आहे.

https://www.instagram.com/p/CO8WJ9yn8tE/?utm_source=ig_web_copy_link

या शोच्या प्रेक्षकांच्या अर्थात सोशल मीडिया युजर्सच्या मते, शन्मुख आणि दानिश केवळ एकाच जॉनरची गाणी गातात दिसतात. त्यांना दुसरे असे काहीच येत नाही. शन्मुख गतेवेळी नुसती किंचाळते, ओरडते आणि दानिश, तो तर फक्त ओव्हरअ‍ॅक्टिंग करतो.

यामुळे या दोघांनाही लवकरात लवकर शोमधून बाहेर काढा अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. किंचाळणे, ओरडणे म्हणजे गाणे नव्हे..आधी त्यांना बाहेर काढा, असे म्हणत प्रेक्षक संताप दर्शवित आहेत.

https://www.instagram.com/p/CO7ZPP-qs8o/?utm_source=ig_web_copy_link

‘इंडियन आयडॉल’चे स्पर्धक केवळ ओरडत आहेत, काही सिंगर्स तर नुसते किंचाळत आहेत, असे एका युजरने लिहिले आपली प्रतिक्रिया मांडताना लिहिले आहे. तर अन्य एका युजरने प्लीज, प्लीज मेकर्स दानिश आणि शन्मुखप्रियाला बाहेर काढा. खूप इरिटेटिंग आहे, यांचे गाणे सहन होत नाही, असे लिहित दोघांनबाबत राग व्यक्त केला आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर अनेक मीम्ससुद्धा वाऱ्यासारखे वायरल होताना दिसत आहेत.

अगदी काहीच दिवसांपूर्वी ‘किशोर कुमार स्पेशल’ या एपिसोडच्या निमित्तमात्र शोचे परीक्षक नेहा कक्कर व हिमेश रेशमिया यांना लोकांनी सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केले होते.

या दोघांना या स्पेशल एपिसोडमध्ये किशोर कुमार यांची बहारदार गाणी गाताना पाहून आणि ऐकून लोकांनी दोघांनाही जमके फैलावर घेतले होते आणि भयंकर ट्रोल केले होते. नेहा व हिमेशने किशोर कुमार यांच्या गाण्यांचा अक्षरश: वाट लावली, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या होत्या.

https://twitter.com/Kiran04853123/status/1393970063737196544

तर किशोर कुमार स्पेशल एपिसोडसाठी किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार हे स्पेशल गेस्ट म्हणून आले होते. त्यांनीही या एपिसोडबाबत नाराजी व्यक्त केली होती. शूट सुरू होण्याआधीच स्पर्धक कसेही गायले तरी त्यांचे कौतुक करा, असे मला सांगण्यात आले होते. मला जे सांगितले गेले, तेच मी केले. मी फक्त पैशांसाठी या शोमध्ये गेलो होतो, असे अमित कुमार यांनी मीडियासोबत बोलताना सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here