थर्ड अँगल | आंतरराष्ट्रीय यंत्रणा जेव्हा एकाच धर्मातील लोकांवर covid-१९ च्या संक्रमणाचा कलंक लावण्यास थांबविण्यास सांगते, तेव्हा भारताने न संतापता आत्मपरीक्षण केले पाहिजे. उदाहरणार्थ, मुस्लिमांवरील हल्ले सतत सुरु आहेत. एका तरुण मुस्लिम मित्राला या सगळ्याला सामोरे जाताना पाहिल्यावर त्याने मला स्पष्टपणे सांगितले, मी हे होण्याचीच वाट बघत होतो. हिमाचल प्रदेशमधील, उना गावच्या एका मुस्लिमाने, त्याला त्याच्या गावकऱ्यांनी वाळीत टाकल्यामुळे आत्महत्या केली. हे अजिबात आश्चर्यकारक नव्हते की आपल्या सरकारला या जागतिक संकटामध्ये या धार्मिक गुन्ह्यांबद्दल बोलू वाटत नाही किंवा त्यांचे इकडे लक्षही जात नाही. उदाहरणार्थ, किती मुस्लिम विक्रेत्यांवर आपण बहिष्कार टाकतो आहोत, त्यांना आपल्या गल्लीतही येऊ देत नाही आहोत याची गणनाही केली जात नाही. पंजाबमध्ये मुस्लिमांना नदीच्या काठावर झोपण्यास जबरदस्ती केली जात असल्याचे अहवाल येत आहेत. पण कुणाला काहीच फरक पडत नाही. मुस्लिमांमध्ये उदासीनता, भीती तर आहेच शिवाय मुस्लिमांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अगदी माध्यमातले काही चांगले लोकसुद्धा या जुन्या सामाजिक रोगामध्ये पडले आणि तबलिगी जमातीचा संबंध covid-१९ शी जोडून संबंधित मजकूर वर्तमानपत्रामध्ये छापला. “तबलिगी जमातीवर” रोज बोललेच पाहिजे असे दिल्ली सरकारला वाटते आहे. जर मरकज कार्यक्रमानंतर लोक covid -१९ च्या तपासण्या करत आहेत तर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या किती आहे हे मुद्दे चर्चेत किंवा अहवालात येण्याची गरज नाही का? त्यांच्यामुळे covid-१९ चे मोठ्या प्रमाणात रुग्ण तयार झाले आहेत का? आता मुस्लिम हे covid-१९ पसरवणारे उत्कृष्ट वाहकच आहेत असा जणू ठपकाच त्यांच्यावर बसला आहे. या सगळ्या गोष्टी ठरवण्याआधी त्यांच्या जमातीतील किती लोकांचे नमुने सकारात्मक आहेत याचा शोध तज्ज्ञांनी घेतला पाहिजे. आपण जमातीशी संबंधित आणि इतर नमुने यांच्यात तुलना केली पाहिजे. मुस्लिम तिरस्कर्त्यांना त्यांच्यावर हल्ला करण्याचे या कार्यक्रमामुळे एक निमित्तच मिळाले. या गोष्टी सतत का होत आहेत? कोरोना विषाणूच्या उद्रेकाची बातमी येण्याआधी जेव्हा भेदभावाचा नागरी कायदा एनआरसी आणि एनपीआर विरोधात ते एकत्र आले होते, तेव्हाच हिंदूंच्या मनात मुस्लिमांच्या विरोधात अनिश्चितता वाढली होती. हा विरोध म्हणजे मुस्लिमांसाठी आत्महत्याच होती. ज्यामुळे हिंदूंमध्ये भीती निर्माण झाली आणि ते आणखी दूर झाले.
मुस्लिमांबद्दल खोलवर रुजलेल्या फोबियाबद्दल बोलणे सोडून बरेच लोक त्यांना उत्तम मुस्लिमासारखे वागून, उत्तम नागरिक म्हणून राहा असा सल्ला देत आहेत. मुस्लिम फोबिक साहित्य हे या आभासी जगात प्रचंड प्रमाणात तयार होत आहेत आणि सर्वत्र पसरत आहे.
विषाणूविरूद्धच्या युद्धभाषेत मुस्लिमांसाठी खूपच तीव्र परिस्थिती झाली आहे. आपण विषाणू बघू शकत नाही पण विषाणूचे संक्रमण करणारा वाहक आपण बघू शकतो. म्हणून आपले योद्धे त्यांच्यावर हल्ला करून आपल्या देशाला सुरक्षित ठेवत आहेत. तरुणांचे समूह त्यांच्या स्थानिकांना आणि गावांना मुस्लिम समूहांवर हल्ले करून त्याचा प्रसार करून वाचवत आहेत. मशिदींची तोडफोड केली जात आहे. हळूहळू हिंदूंनी मुस्लिमांसोबत कसलेच संबंध ठेवू नयेत ही भावना मूळ धरू लागली आहे. यामुळे मुस्लिमांना त्यांच्या आर्थिक क्षेत्रातून बाहेर काढले जाऊ शकते. असो, त्यांच्यातले काहीजण औपचारिक क्षेत्रात आहेत. जर हे असेच वाढत गेले तर त्यांना अनौपचारिक क्षेत्रात बंदीच घातली जाईल. राजकीय आणि सामाजिक परकेपणानंतर ही गोष्ट त्यांच्यासाठी अतिआपत्तीजनक ठरू शकते. जवळजवळ त्यांच्या अस्तित्वाच्याच धोक्याची आपत्ती. स्वतंत्र भारताच्या सातव्या दशकात मुस्लिमाना पद्धतशीरपणे यहुदी वस्त्यांमध्ये राहण्यास जबरदस्ती केली गेली. भारतात पूर्वीच हिंदू आणि मुस्लिम हे दोन संवेदनशील भाग होते. सध्याचे संकट हे विभाजन आणखी खोल करते आहे.
कोरोना विषाणूने मानवाची दुर्बलता आणि असहायता उघड केली आहे. या विषाणूला सामोरे जाण्यासाठी आपण मानवी समाज म्हणून सर्वच परंपरांच्या पुढे जाऊन वैज्ञानिक आणि अध्यात्मिक स्रोत एकत्र घेऊन पुढे चालले पाहिजे. हे आपल्याला आपल्या मर्यादांमधून बाहेर पडून, हातात हात देऊन, मन आणि मेंदूने एकत्र येऊन एकमेकांपासून शिकण्यास सांगत आहे. दुसऱ्याबद्दल तुच्छता आणि अयोग्य विचार आपल्याला आता परवडणारे नाहीत.
लेखक दिल्ली विद्यापीठात हिंदी विषय शिकवतात. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.