हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Oil सध्याच्या जागतिक मंदीच्या काळात काही शेअर्स असेही आहेत जे आपल्या शेअरहोल्डर्सना भरपूर रिटर्न बरोबरच चांगला डिव्हीडंड आणि बोनस देखील देतात. जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये अशा कंपन्यांचे पुरेसे शेअर्स ठेवले तर त्याद्वारे आपल्याला नियमित उत्पन्न देखील मिळेल. हे लक्षात घ्या कि, अनेक कंपन्याकडून एफडीमध्ये मिळणाऱ्या व्याजाच्या दुप्पटी इतका डिव्हीडंड मिळतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कंपनीचे शेअर्सदेखील असेच आहेत.
हे लक्षात घ्या कि, IOCL च्या शेअर्सने आपल्या शेअरहोल्डर्सना 1.7 टक्के वार्षिक (YTD) रिटर्न दिला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात तर कंपनीने तीनदा डिव्हीडंड दिला आहे. यामुळे Indian Oil च्या शेअरहोल्डर्सना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर 15.70 टक्के इतका मोठा रिटर्न मिळाला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी कि, गेल्या फक्त एका वर्षातच या शेअर्सने 1.70 टक्के रिटर्न दिला आहे. ज्याद्वारे शेअरहोल्डर्सनी 16 टक्के कमाई केली आहे.
किती डिव्हीडंड मिळेल ???
2021-22 या आर्थिक वर्षात Indian Oil ने आपल्या शेअरहोल्डर्सना तब्ब्ल तीन वेळा डिव्हीडंड दिला. ज्यामध्ये 11 नोव्हेंबर 2021 रोजी प्रति इक्विटी शेअर ₹ 5 तर 9 फेब्रुवारी 2022 रोजी ₹ 4 प्रति इक्विटी शेअर आणि 2021-22 आर्थिक वर्षासाठी ₹ 2.40 प्रति शेअर डिव्हीडंड दिला. अशा प्रकारे, IOCL कडून भागधारकांना प्रति इक्विटी शेअर (₹5 + ₹4 + ₹2.40) एकूण ₹11.40 डिव्हीडंड देण्यात आला आहे.
इथे हे जाणून घ्या कि, NSE वर IOCL च्या शेअर्सची सध्याची किंमत ₹ 72.70 आहे. तर इंडियनऑइलचे वार्षिक डिव्हीडंड उत्पन्न 15.70 टक्के [{(₹5 + ₹4 + ₹2.40)/72.70} x 100] आहे.
किती नफा मिळाला ???
आर्थिक वर्ष 2022 मध्ये Indian Oil च्या शेअर्सचे वार्षिक डिव्हीडंड उत्पन्न 15.70 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या सुरुवातीला या कंपनीत एखाद्या भागधारकाचा 10 लाख रुपयांचा हिस्सा असेल तर कंपनीने घोषित केलेल्या 15.70 डिव्हीडंड मिळाल्यानंतर कोणतेही शेअर्स न विकता त्याला 1.57 लाख रुपये मिळाले असते. ज्या कंपन्या चांगला डिव्हीडंड देतात त्या आपल्या शेअरहोल्डर्सना चांगला नफा देतात. विशेषत: सरकारी कंपन्यांकडून सर्वाधिक डिव्हीडंड दिले जातात. Indian Oil
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://iocl.com/
हे पण वाचा :
Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी वाईट बातमी !!! MCLR वाढल्याने कर्ज महागले
Business ideas : ‘या’ रोपांची लागवड करून कोट्यवधी रुपये !!!
Bank of Maharashtra मधून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार ‘हा’ फायदा, MCLR मध्ये केली कपात
UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…
ITR भरताना करू नका ‘या’ 5 चुका !!! अन्यथा होऊ शकेल नुकसान