हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Overseas Bank कडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. मात्र ही दर वाढ 2 कोटींपेक्षा कमी FD वरच उपलब्ध असेल. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहिती नुसार 13 सप्टेंबरपासून हे नवीन व्याजदर लागू होणार आहेत. दुरुस्तीनंतर, Indian Overseas Bank कडून फिक्स्ड डिपॉझिट्सच्या सर्व कालावधीसाठीचे व्याजदर वाढविण्यात आले आहेत. आता 7 दिवस ते 3 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीच्या FD वरील व्याजदर 3.25 ते 5.85 टक्के या श्रेणीत असतील.
Indian Overseas Bank ने 7-29 दिवसांच्या FD वरील व्याजदर 3 टक्क्यांवरून 3.25 टक्के केला आहे. त्याच वेळी, 30-45 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सचे व्याज दर 3 टक्क्यांवरून 3.35 टक्के झाले आहे. 46 ते 90 दिवसांच्या FD वर 3.75 टक्के तर 90 ते 179 दिवसांच्या FD वर 4.10 टक्के व्याज मिळेल. याशिवाय 180 दिवस ते एक वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 4.65 टक्के व्याज देईल.
Indian Overseas Bank ने एक वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.60 टक्के केला आहे. तसेच, 444 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वरील व्याजदर 5.65 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, बँकेने 1000 दिवसांची नवीन FD समाविष्ट केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 6 टक्के व्याज मिळेल.
Indian Overseas Bank ने आपल्या वेबसाइटवर माहिती देताना सांगितले की, सर्व फिक्स्ड डिपॉझिट्सच्या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षे आणि त्यावरील नागरिक) 0.75 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/Domestic_Rates
हे पण वाचा :
Stock Market मधील ‘या’ सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.33 लाख कोटी रुपयांची वाढ
Investment : ‘या’ 5 लहान बचत योजनांमध्ये गुंतवणुक करून टॅक्स सूटसोबतच मिळवा चांगले रिटर्न
Gold Price : सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती !!!
अमेरिकेतून नवीन iPhone 14 खरेदी करण्याचे फायदे अन् तोटे जाणून घ्या
Canara Bank चा ग्राहकांना धक्का, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार