Indian Overseas Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, FD वर मिळणार जास्त व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Indian Overseas Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Indian Overseas Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

What went wrong at Indian Overseas Bank | Mint

10 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू

Indian Overseas Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 10 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदलानंतर आता बँकेकडून 7 दिवस ते 3 वर्षे आणि त्याहून जास्त कालावधीच्या FD वर 3.75% ते 6.50% पर्यंतचा व्याजदर दिला जाईल.

Indian Overseas Bank Q3 results: Posts net profit of Rs 213 cr - The  Economic Times

Indian Overseas Bank च्या एफडीचे नवीन दर

Indian Overseas Bank ने 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वरील व्याजदरात 15 bps ने वाढ केली आहे. जो आता 3.75 टक्के झाला आहे. तसेच बँकेने 46-90 दिवसांच्या FD वरील व्याजदरात 20 bps ने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे बँक आता 91-179 दिवसांच्या FD वर 4.20 टक्के, 180-269 दिवसांच्या FD वर 4.85 टक्के आणि 270 दिवस ते 1 वर्षाच्या FD वर 5.25 टक्के व्याजदर देईल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/Domestic_Rates

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे