Indian Railways | राज्यात गणेश उत्सवाच्या (Ganesh Festival) निमित्ताने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वेगवेगळे देखावे उभारले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरच रेल्वे प्रशासनाने आता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुण्यातून तीन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी या काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. त्यामुळेच यावर्षी देखील विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
‘या’ तारखेला विशेष रेल्वे सेवा
कोकणात गणेश उत्सव सण खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याकाळात पुणे, मुंबईत नोकरीसाठी आलेले लोक सुट्टी काढून आपल्या गावी जातात. यामुळे रेल्वे स्थानकांवर देखील प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. तसेच, यामुळे गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढवाव्या लागतात. रेल्वे प्रशासनाकडून (Indian Railways) दरवर्षी गणेशत्सवासाठी मुंबई, पुण्यातून ‘गणपती विशेष रेल्वे गाड्या’ सोडल्या जातात. यावर्षी ही पुणे विभागाकडून १५, २२ आणि २९ सप्टेंबर रोजी विशेष गाड्या सोडल्या जातील. यामुळे नागरिकांना वेळेत आपल्या गावी जाता येईल.
रेल्वे गाड्यांचा थांबा कोणता- Indian Railways
रेल्वे प्रशासनाकडून या विशेष रेल्वे गाड्या पुणे, लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकापर्यंत असतील. त्यामुळे या विशेष गाड्यांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केली आहे. मुख्य म्हणजे या गाड्या फक्त गणेश उत्सवाच्या निमित्ताने सोडल्या जात आहेत. याचा मोठा फायदा गावी जाणाऱ्या नागरिकांना होईल.
पुणे स्थानकाचे वेळापत्रक
पुणे स्थानकावरून सुटणारी पुणे-कुडाळ रेल्वे १५, २२ आणि २९ सप्टेंबर सोडली जाईल. सायंकाळी ६.१५ वाजता बरोबर ही विशेष रेल्वे सोडली जाईल. तर कुडाळ स्थानकातून १७ व २४ सप्टेंबर आणि 1 ऑगस्ट रोजी विशेष रेल्वे सोडली जाईल. कुडाळ स्थानकातून दुपारी ४.०५ वाजता ही विशेष रेल्वे सोडण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना या वेळेत आपल्या घरी जाता येईल. तसेच गणेशोत्सव आनंदात साजरी करता येईल.