हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेचे जाळे (Indian Railways) सर्वदूर पसरलेले आहे. लांबच्या प्रवासातही खिशाला परवडणारी आणि महत्वाचे म्हणजे आरामदायी प्रवास असल्याने देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्याची संख्या देखील अधिक आहे. मात्र रेल्वेने प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. काही दिवसांपूर्वीच ओडिसा मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 296 जणांचा मृत्यू झाला होता. परंतु रेल्वे अपघातात दगावलेल्या व जखमी झालेल्या लोकांना किंवा यापूर्वी अनुक्रमे 50 हजार आणि जखमीला 25 हजार देण्याची तरतूद आहे. सध्यस्थिती नुसार जी की अत्यंत तुटपुंजी समजली जाते. परंतु आता भारतीय रेल्वे विभागाने या नुकसान भरपाईच्या रकमेत तब्बल १० पटीने वाढ केली आहे.
मृत्यूमुखी पडलेल्यांना 5 लाख रुपये मदत- Indian Railways
आता रेल्वे अपघातात (Railway Accident ) मृत्यूमुखी पडलेल्यांना 5 लाख रुपये आणि जखमी असलेल्या प्रवास्यांना 2.5 लाख रुपये रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. रेल्वे विभागाने अचानकपणे केलेल्या या भरगोस नुकसान भरपाईच्या वाढीमुळे प्रवाशांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण असेल.
भविष्याच्या दृष्टिकोनातून घेतला निर्णय
मदतनीधीवाढ करण्यासंदर्भात आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असून या निधीची मदत भविष्यात होणाऱ्या अपघातात रेल्वेच्या प्रवास्यांना मिळावी या दृष्टीने रेल्वे बोर्डने आवश्यक आदेश जारी देखील केला आहे. त्यामुळे रेल्वेने (Indian Railways) आपल्या प्रवाश्यांना स्वस्त, सुखकर असा प्रवास देण्याबरोबरच त्याचा भविष्याचा देखील विचार केला आहे असे दिसते.
प्रवाश्यांना सुविधा देण्यासाठी रेल्वे करतंय काम
दरम्यान, भारतीय रेल्वे सुविधेत वाढ करण्यासाठी सरकार कटीबद्धतेने काम करताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे प्रवासाची गती वाढवणे , प्रवाश्याना अधिक आरामदायक सुविधा देणे यासाठी भारतीय रेल्वे काम करताना दिसत आहे. त्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सारखे प्रयोग होताना दिसत आहे. रेल्वेची गती 110 km/hr वरून 160 km/hr पर्यंत नेण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यासाठी रेल्वेची गतिमानता वाढवताना प्रवाशांच्या सुरक्षितेची बाजू सक्षम करण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतलेला दिसतो.