व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राहुल नार्वेकरांचं तातडीनं दिल्लीला जाण्याच कारण काय? अखेर ‘ती’ बातमी फुटली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदारांच्या अपात्रेप्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना धारेवर धरले होते. यावेळी न्यायालयाने नार्वेकर यांना पुढील एक आठवड्यात या प्रकरणी सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, न्यायालयाकडून ऑर्डरची कॉपी आल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु आणि मग भूमिका मांडू असे नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आले होते. यानंतर आज राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्य म्हणजे, नियोजन दौरा असल्यामुळे दिल्लीला जात असल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली असली तरी या दौऱ्या मागील मुख्य कारण शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी उघडकीस आणले आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

आज माध्यमाची संवाद साधताना संजय शिरसाट यांनी राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्या मागील मुख्य कारण सांगितले आहे. यावेळी त्यांनी म्हणले आहे की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. कायदे तज्ज्ञ जे मार्गदर्शन करतील त्यानुसार या ठिकाणी कारवाई केली जाईल. यापूर्वीच त्यांनी दोन आठवड्याचा वेळ दिला होता. पण आता घाई जास्त आहे. ही माहिती देऊन शिरसाट यांनी नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्याची बातमी फोडली आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना, “हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे आम्ही पालन करू. जे काही आदेश आम्हाला देण्यात येतील किंवा जी काही भूमिका आम्हाला मांडायची असेल ती आम्ही योग्य पद्धतीने मांडू, एक-दोन दिवसांमध्ये आम्हालाही नोटीस येतील. या नोटीसचे उत्तर आम्ही सुद्धा देऊ. आमची बाजू भक्कम आहे, असं आम्ही यापूर्वी म्हणालो आहोत. आम्ही आताही म्हणतोय” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.

दरम्यान, राहुल नार्वेकर जर खरच कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले असतील तर लवकरच राज्यात आमदारांच्या अपात्रेप्रकरणाचा निकाल लावला जाईल. सध्या सर्वांचे लक्ष आमदारांच्या अपात्र निकालाकडे लागून राहिले आहे. यामध्ये राहुल नार्वेकर सुनावणी करण्यास उशीर करत आहेत अशी टीका केली जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नार्वेकर यांच्याकडून ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे.