Indian Railways : रेल्वे प्रवासात आता Whatsapp वरून ऑर्डर करा जेवण; हा नंबर सेव्ह करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणे प्रत्येकाला आवडतं. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. या सुविधांपैकी एक असलेली सुविधा म्हणजे जेवण. रेल्वे प्रवाशी आता डायरेक्ट व्हाट्सअप नंबरच्या माध्यमातून प्रवास करताना ऑर्डर देऊ शकतात. या सुविधेचा सर्वात मोठा उद्देश आहे की, रेल्वे मध्ये प्रवाशांना जेवण करत असताना कोणताही त्रास होऊ नये. त्यांना चांगला अनुभव मिळावा. त्याचबरोबर प्रवाशांना हवं ते अन्न मिळावं.

आज काल प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशन झालेलं दिसत आहे. त्याचप्रमाणे आता रेल्वेमध्ये (Indian Railways) देखील डिजिटल स्वरूपात सर्व कामे झाल्याचं आपण पाहत आहे. आता जेवण देखील डिजिटल स्वरूपात ऑर्डर करता येऊ शकते. यासाठी रेल मित्र वरून तुम्ही डायरेक्ट whatsapp वरून जेवण ऑर्डर करू शकता. रेल मित्रची ही फूड ऑर्डर सुविधा युनिक असून प्रवासी आता डायरेक्ट रेल्वे ग्राहक सहाय्यता कार्यकारी यांच्याशी संपर्क साधून जेवण ऑर्डर करू शकतात. एवढेच नाही तर व्हाट्सअप द्वारे या रेल मित्राला (Indian Railways) प्रश्न विचारू शकतात. आणि जेवणामध्ये काही कमी असल्यास त्याबद्दल माहिती देखील देऊ शकतात.

व्हाट्सअप वरून जेवण मागवण्यासाठी पुढील प्रोसेस फॉलो करा- (Indian Railways)

1. रेल मित्र नावाने 8102888222 हा व्हाट्सअप नंबर सेव करा.
2. त्यानंतर रेल मित्राला मेसेज पाठवा.
3. त्यानंतर रेल मित्र लाईव्ह एजंट सपोर्ट टीम तुम्हाला उत्तर देईल
4. यानंतर तुम्हाला तुमचा दहा अंकी PNR नंबर टाकावा लागेल.
5. यानंतर व्हाट्सअप द्वारे ग्राहक कार्यकारी सोबत तुम्ही संवाद साधू शकता.
6. तसेच तुमच्या जेवणाबद्दल आवश्यक असलेल्या गोष्टी, प्रवासाचे तपशील, फूड बोर्डिंग स्टेशन याबद्दल माहिती द्या.
7. यानंतर ऑनलाइन पद्धतीने किंवा कॅश ऑन डिलिव्हरी या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता.