हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणे प्रत्येकाला आवडतं. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का? रेल्वेने प्रवास करत असताना आपल्याला बऱ्याच सुविधा ट्रेन टिकिट वर उपलब्ध असतात. या सुविधांचा लाभ आपण घेऊ शकतो. परंतु आपल्याला या सुविधांबद्दल माहिती नसते. त्यामुळे आपण या सुविधा वापरत नाही. आज आपण जाणून घेऊया अशा सुविधांबद्दल ज्याचा लाभ आपण प्रवास करताना घेऊ शकतो.
1) फर्स्ट एड सुविधा-
ट्रेनमध्ये प्रवास करत असताना आपल्याला फ्री मेडिकल सुविधा देखील उपलब्ध असते. प्रवास करताना जर तुम्हाला तुमच्या तब्ब्येतीत काही फरक जाणवत असेल किंवा त्रास होत असेल तर रेल्वे कडून फर्स्ट एड ही सुविधा देण्यात येते. त्यासाठी तुम्हाला टीटीई सोबत संपर्क करावा लागतो. ही सुविधा फ्री असल्यामुळे सर्वजण या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
2) वेटिंग रूम सुविधा – (Indian Railways)
आपण रेल्वे स्टेशनवर वेटिंग रूम पाहतो. या वेटिंग रूमचा लाभ देखील आपण घेऊ शकतो. ट्रेन येण्यास उशीर झाल्यास किंवा ट्रेनची वाट पाहत असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. तुमचे व्हॅलिड तिकीट घेतल्यानंतर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही सकाळी प्रवास करत असाल तर ट्रेन येण्याच्या 2 तास आधी आणि ट्रेन आल्यानंतर 2 तास तुम्हाला वेटिंग रूम मध्ये आराम करता येऊ शकतो. त्याचबरोबर ही सुविधा रात्रीसाठी देखील उपलब्ध असून 6 तास तुम्ही ही सुविधा घेऊ शकतात.
3) वायफाय सुविधा-
भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) फ्री वायफाय सुविधा उपलब्ध असते. त्यानुसार रेल्वे स्टेशनवर किंवा रेल्वेमध्ये तुम्ही अर्ध्या तासासाठी फ्री इंटरनेट ची सुविधा घेऊ शकतात. त्यानंतर तुम्ही यात्री रेलटेल कडून तुमचा आवडता प्लॅन घेऊ शकतात. यामध्ये प्लॅटफॉर्मवर 10 रुपयात 5 जीबी डेटा आणि 15 रुपयात 10 जीबी डेटा देण्यात येतो. या पॅकची व्हॅलिडीटी एक दिवसाची आहे. त्याचबरोबर 34 MBPS स्पीड यामध्ये दिला जातो.
4) क्लॉक रूम सुविधा-
रेल्वे प्रवाशांसाठी (Indian Railways) क्लॉक रूम ही सुविधा देखील दिली जाते. या सुविधेचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅव्हल बॅग ठेवू शकतात. या क्लॉक रूम मध्ये 24 तासांसाठी 15 रुपये चार्ज घेतला जातो. यामध्ये दहा रुपये प्रति युनिट या हिशोबाने सामान ठेवले जाते. त्यानंतर 24 तासांसाठी 20 रुपये आणि 12 रुपये प्रति युनिट या हिशोबाने पैसे द्यावे लागतात.