हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात मध्यम वर्गीय लोकांची प्रचंड संख्या आहे. त्यामुळे सामान्य लोकांना परवडेल अश्याच दरात प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वेविभाग (Indian Railways) नेहमीच प्रयत्नशील राहते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या ही दरवर्षी 800 कोटी एवढी आहे. तीच संख्या वाढवण्यासाठी आणि प्रवाश्यांचा प्रवास सोयीचा करण्यासाठी भारतीय रेल्वे आता तब्बल 3,000 नवीन गाड्या सुरू करणार आहे.
5 वर्षांत प्रवासी क्षमता होणार 1,000 कोटी
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, सध्या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही वर्षाला 800 कोटी एवढी आहे. दरवर्षी या संख्येत वाढ दिसून येते. त्यामुळे वाढत्या गर्दीमुळे आम्हाला 800 कोटीची क्षमता 1,000 कोटीवर न्यायची आहे. ही वाढ पुढच्या 4 ते 5 वर्षात होणार असून त्यासाठी आम्हाला 3,000 जादा गाड्यांची गरज आहे ज्या प्रवाशांच्या या वाढलेल्या संख्येला सामावून घेण्यासाठी सक्षम असतील.
रेल्वेकडे सध्या 69,000 नवीन डब्बे
येत्या पाच वर्षात रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी सध्या रेल्वेकडे (Indian Railways) एकूण 69,000 नवीन डबे उपलब्ध आहेत. हे डब्बे निर्माण करणारी कंपनी दरवर्षी सुमारे 5,000 नवीन डबे तयार करत आहे. या प्रयत्नामुळे रेल्वे दरवर्षी 200 ते 250 नवीन गाड्या जोडेल. आणि त्यामध्ये 400 ते 450 नवीन वंदे भारतचा समावेश असेल. त्यामुळे गाड्यांची संख्या 3000 हजारावर नेण्यासाठी अडचण येणार नाही अशी आशा व्यक्त केली जात आहे.
रेल्वे विभाग रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी करतेय प्रयत्न – Indian Railways
भारतीय रेल्वे (Indian Railways) ही आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी इतर प्रयत्नासोबतच रेल्वेचा वेग सुधारण्यासाठी आणि रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी देखील काम करत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या आधीच्या वेळेपेक्षा लवकर स्थानकावर गाडी पोहचेल. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळ वाचणार आहे.
वंदे भारत इतर गाड्यांच्या तुलनेत 4 पटीने चांगली – अश्विनी वैष्णव
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव वंदे भारत बद्दल बोलताना म्हणाले की, वंदे भारत गाड्यांचा वेग हा एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत चार पटीने चांगले आहे आणि त्यामुळे प्रवासाचा बराच वेळ वाचतो.
वर्षाला 5000 किमी रेल्वे ट्रॅक जोडले जाणार
रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अंदाजे 5,000 किमी लांबीच्या रेल्वे ट्रॅकची निर्मिती दरवर्षी केली जाणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. याशिवाय विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांसह 1,000 उड्डाणपूल आणि अंडरपासच्या मंजुरीचाही उल्लेख केला आहे. यात विशेष बाब म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत 1,002 उड्डाणपूल आणि अंडरपास पूर्ण झाले असून यावर्षीचे 1,200 उद्दिष्ट आहे. त्यामुळे याचा प्रवाश्यांना नक्कीच फायदा होईल.