आजची स्पेशल रेसिपी : ‘गुळाचे अनारसे’

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । गुळाचे अनारसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम पाहुयात ,

साहित्य – तांदूळ , गूळ , तूप , खसखस

कृती –  १. तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला.

२ . अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

३. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढा गूळ किसून पिठात मिसळवून घ्या.

४. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे तूप घाला. सर्व पीठ कालवून गोळे करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.

५. ३ – ४ दिवसांनी अनारशांचे पीठ तयार होते. अनारसे करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या.

६. त्यात १-४ साईचे दही गालून पीठ मळा. नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या.

७. नंतर हा अनारसा मंद आचेवर तळून घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here