#Modi_job_do | ‘हे’ मीम्स होतायत प्रचंड व्हायरल! पहा भारतातील तरुण का करत आहेत पंतप्रधानांना टार्गेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील वाढत्या बेरोजगारीचा उद्रेक आज ट्विटरवर पाहायला मिळत आहे. अनेक तरुण आणि मोठ्या नेत्यांनी मोदींना ट्विटरवर टार्गेट करणे सुरू केले आहे. मोदी रोजगार दो, मोदी जॉब दो अश्या प्रकारचे ट्रेण्ड आज पासून (25 फेब्रुवारी) पासून ट्विटरवर धुमाकूळ घालत आहेत.

https://twitter.com/KhanSir_/status/1364795536872665092

#modi_job_do, #modi_rojgar_do हे ट्विटर ट्रेण्ड संपूर्ण देशभरामध्ये आज गाजत आहेत. आत्तापर्यंत 38 लाख लोकांनी यावर ट्विट आणि रिट्विट केले आहे. यासोबतच वेगवेगळे मिमपण यावर पाहायला मिळत आहेत. रोजगार देण्यापासून सरकार कसा कानाडोळा करत आहे हे तरुण या मिममधून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

https://twitter.com/Amrk94/status/1364795242160009216

देशभरामध्ये आर्थिक परिस्थिती ठीक नसताना आणि सद्ध्याच्या परिस्थितीमध्ये रोजगार आणि आरोग्य यावर सरकारने प्राथमिकता देणे गरजेचे असताना, सरकार देशाचे लक्ष भटकवण्याचे काम करत असल्याचेही काही तरुण ट्विटरवर म्हणत आहेत. रेल्वे, एसएससी आणि इतर परीक्षेचे वेळापत्रक दोन ते तीन वर्ष जुने असून केवळ त्याचे अर्ज भरून घेतले आहेत.

https://twitter.com/g48660305/status/1364795789239754755

रेल्वेच्या एका जाहिरातीसाठी कोट्यावधी फॉर्म येतात. त्यातून हजारो कोटी रुपये अर्जाचे शुल्क शासनाकडे जमा होते. पण नंतर रेल्वे, एसएससी आपल्या परीक्षा घेऊन त्याचे निकाल लावणे विसरते असेही काही ट्विटर वापरकर्ते त्यांच्या ट्विट आणि मिम मधून म्हणत आहेत.

Leave a Comment