विशेष प्रतिनिधी। अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत. तर या यादीमध्ये अदानींने आठ स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे.
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार ६२ वर्षीय मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ बिलियन डॉलर (अंदाजे ३ लाख ७० हजार कोटी) इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अदानी यांची संपत्ती १५.७ बिलियन डॉलर (अंदाजे १ लाख १५ हजार कोटी) इतकी आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये उद्योजक हिंदूजा बंधू, बांधकाम क्षेत्रातील पलोनजी मिस्त्री, बँकर उदय कोटक, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव असणारे शीव नादार, गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानिया, गोदरेज कुटुंबिय, पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल, उद्योजक कुमार बिर्ला यांचा समावेश आहे.
तर देशातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सहा जणांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. यामध्ये बायजू या अँपचे संस्थापक बायजू रविंद्रन, हल्दीरामचे मनोहर लाल आणि मधुसूदन अग्रवाल, टाइल्स व अन्य उत्पादने करणारी जॅग्वार या कंपनीचे मालक राजेश मेहरा यांचा पहिल्यांदाच अव्वल १०० श्रीमंतांमध्ये समावेश झाला आहे.
इतर काही बातम्या-
‘पवारांना हा पाटील कोण आहे हे अजून ओळखता आला नाही’ – चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर – https://t.co/ixmplrG0JX@ChDadaPatil @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @BJP4India #Vidhansabha2019 #MaharashtraAssemblyElections
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
भाजप सरकार हे धनदांडग्याचं; वनजमीन हडपण्याचा सरकारचा डाव – सीताराम येचुरी
वाचा सविस्तर – https://t.co/iRR78oiNKf@cpimspeak @SitaramYechury @CPIM_WESTBENGAL @BJP4India @PMOIndia #development #ModiHaiToMumkinHai
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
पंढरपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं चाललंय काय? दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा विरोधात प्रचार सुरूच
वाचा सविस्तर – https://t.co/8vLCfLEPxw@INCMumbai @IYC @NCPspeaks #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019