हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India’s Costliest Apartment : गेल्या काही वर्षांत आलिशान घरांची मागणी चांगलीच वाढली आहे. तसे पहिले तर पूर्वीच्या काली देखील राजे-महाराजे आपल्या राहण्यासाठी आलिशान महाल बांधत असत. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये ही परंपरा आहे. मात्र आता काळ थोडा बदलला आहे. आता लोकं मोठ-मोठ्या पॅलेसमध्ये नाही तर आलिशान फ्लॅटमध्ये राहत आहेत. या फ्लॅट्समध्ये प्रत्येक सुविधा मिळतात. आजही देशातील मोठ्या शहरांमध्ये सर्वसुखसोयी असलेले आलिशान फ्लॅट बांधले जात आहेत. हे फ्लॅट कोणत्याही सप्ततारांकित हॉटेलपेक्षा कमी नाहीत. तर आजच्या या बातमीमध्ये आपण अशाच एका आलिशान फ्लॅटची माहिती जाणून घेणार आहोत…
हे लक्षात घ्या कि, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात महागड्या फ्लॅटची विक्री झाल्याची माहिती समोर आली होती. उद्योगपती जेपी तापडिया यांनी दक्षिण मुंबईतील मलबार हिल्स येथे 369 कोटी रुपयांमध्ये हा फ्लॅट विकत घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. हे वर आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोढा ग्रुपच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स या कंपनीने हे अपार्टमेंट बांधले आहे. तापडिया यांनी या लोढा मलबार सुपर लक्झरी रेसिडेन्शिअल टॉवरच्या 26व्या, 27व्या आणि 28व्या मजल्यावर ट्रिपलेक्स खरेदी केला आहे. 1.08 एकरमध्ये पसरलेला या टॉवरमधून अरबी समुद्राच्या लाटांचे सुंदर दृश्य पाहता येते. यासोबतच मुंबईतील सर्वात सुंदर हँगिंग गार्डन देखील आहे.India’s Costliest Apartment
या ट्रिपलेक्सची लिव्हिंग रूम अशी आहे
एकूण 27,160 स्क्वेअर फूटचा हा ट्रिपलेक्स फ्लॅट आहे. सर्वसाधारणपणे 1000 स्क्वेअर फूटमध्ये एक सरासरी 2BHK फ्लॅट बांधला जातो. या सुपर लक्झरी ट्रिपलेक्समध्ये 27 पेक्षा जास्त 2BHK बांधता येऊ शकतील. यावरूनच हा ट्रिपलेक्स किती भव्य असेल हे कळून येईल. या ट्रिपलेक्सच्या स्क्वेअर फूट रेटवर नजर टाकली तर तो 1.36 हजार फुट आहे. जो देशातील सर्वात महाग निवासी मालमत्ता ठरली आहे. एका रिपोर्टनुसार, तापडिया कुटुंबाने या ट्रिपलेक्सच्या रजिस्ट्रेशनसाठी 19.07 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील भरली आहे. India’s Costliest Apartment
बजाज कुटुंबानेही खरेदी केला ट्रिपलेक्स
हे लक्षात घ्या कि, देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि बजाज ऑटोचे अध्यक्ष नीरज बजाज यांनीही या टॉवरमधील 29व्या, 30व्या आणि 31व्या मजल्यावर 252.5 कोटींमध्ये एक ट्रिपलेक्स खरेदी केला आहे. एकूण 18008 स्क्वेअर फूटचा हा फ्लॅट आहे. यासहीत त्यांना आठ गाड्यांच्या पार्किंगसाठी देखील जागा मिळाली आहे. एका रिपोर्टनुसार, बजाज कुटुंबाने 13 मार्चला रजिस्ट्रेशन केले आहे. ज्यासाठी त्यांनी 15.5 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. India’s Costliest Apartment
जगातील सर्वोत्तम कंपनीने तयार केले डिझाइन
लोढा मलबार प्रोजेक्ट हा जगातील आघाडीच्या आर्किटेक्चर कंपनी असलेल्या हाफीज कॉन्ट्रॅक्टरने डिझाइन केला आहे. आजपर्यंत अशी लक्झरी कोणी पाहिली नसावी, असा दावा देखील याबाबत केला जातो आहे. या ट्रिपलेक्समधील इंटेरियर चे काम स्टुडिओ एचबीएने केले आहे. ही कंपनी आपल्या सुंदर आर्ट डिझाईनसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. India’s Costliest Apartment
लिव्हिंग आणि बेड रूम
http://LodhaLuxury.com या वेबसाईटवर या ट्रीप्लेक्सचे काही फोटोज देखील अपलोड करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सी-फेसिंग लिव्हिंग रूम दिसत आहे. तसेच त्यातील सोफा आणि आर्ट वर्क पाहून डोळेच दिपून जातील. या ट्रीप्लेक्समध्ये ऑफिससाठी देखील अनेक खोल्या, लिव्हिंग रूम आणि अनेक बेडरूम आहेत. सर्व खोल्यांमधून बाहेरचे अप्रतिम दृश्य दिसते. India’s Costliest Apartment
हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक