नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात २४ हजार २४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यामध्ये ४२५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९७ हजार ९१३ वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाच्या आकडेवारीत भारताने रशियाला देखील मागे टाकलं आहे. भारत त्या टॉप तीन देशात आहे जेथे कोरोनाचं संक्रमण सर्वाधिक आहे.
Covid19india.org या संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या आधी रशिया तिसऱ्या स्थानी होता. अमेरिका, ब्राझील पाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, दुसऱ्या स्थानी ब्राझील आहे.
देशभरात आतापर्यंत ४ लाख २४ हजार ४३३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १९ हजार ६९३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. २४ तासांत १५ हजार ३५० रूग्णांनी कोरोनाशी दोन हात केले आहे. देशभरात २ लाख ५३ हजार २८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, आसाम आणि बिहार या राज्यांत रुग्णवाढ अधिक आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, ५ जुलैपर्यंत ९९ लाख ६९ हजार ६६२ लोकांची स्लॅब टेस्ट करण्यात आली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”