हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जायचे असल्यास सर्वात आधी डोळ्यासमोर येते इंडिगोचे विमान. दुसऱ्या राज्यात किंवा देशात जाण्यासाठी इंडिगो कंपनीचे विमान (Indigo) हे सुरक्षित आणि अधिक आरामदायक वाटते. नुकताच इंडिगोने आपले प्रवास शुल्क कमी केले आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना याचा फायदा होत आहे. परंतु, याच इंडिगो कंपनीच्या विमानात एसटीसारखी अवस्था झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे प्रवाश्यांना याचा धक्का बसला आहे.
नेमक काय घडलं?
इंडिगोच्या विमानाने प्रवास करत असताना रया घोष या महिला प्रवासीने घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, इंडिगोच्या फ्लाईटने जाण्यासाठी विमानामध्ये गेले असताना माझ्या जागेवर गेले मात्र तिथे चक्क सिटच नव्हती. मात्र ही फ्लाईट कोणत्या ठिकाणहून कुठे जात होती याची माहिती समोर आली नाही. फ्लाईट मधील गैरसोय झाल्यानंतर या महिलेची दुसरी व्यवस्था करण्यात आली मात्र या महिलेने सिटचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे.
इंडिगोने केली दिलगिरी व्यक्त
या झालेल्या प्रकरणामुळे सर्व प्रवाश्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे इंडिगो वरती अनेक क्षेत्रातून बोट उचलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची इंडिगोने दखल घेतली आणि या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. इंडिगो हे विमान प्रवासातील वैशिष्ट्यपूर्ण असलेली विमान कंपनी आहे. त्यामुळे अश्या नामांकित कंपनीच्या विमानात अशी गैरसोय झाल्यामुळे नेटकरी यावर टीका करताना दिसून येत आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी इंडिगो कंपनीची विमान सेवा ही स्वस्त होणार अशी बातमी होती. मात्र इंडिगोने आपल्या ठराविक जागेसाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे भरावे लागणार असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये कंपनीने सांगितले की, समोरच्या सीटसाठी तसेच विंडो सीटसाठी एकूण 2000 रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. तर पुढच्या आणि मधल्या सीटसाठी 1500 रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. त्यामुळे प्रवास स्वस्त स्वस्त म्हणता – म्हणता अचानक इंडिगोने आपले प्रवासी भाडे वाढवलले असल्यामुळे इंडिगो फ्लाईटने जाणाऱ्या प्रवाश्यांना धक्का बसला आहे.