Monday, February 6, 2023

उड्डाण करतानाच इंडिगो विमानाच्या इंजिनला आग, Video आला समोर

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमानामध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे विमानाच्या इंजिनाला आग लागली, विमान कोसळले असा घटना आपण पहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशीच एक घटना शुक्रवारी रात्री दिल्ली विमानतळावर घडली. यामध्ये दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये आग (indigo flight engine caught fire) लागली. विमानाने उड्डाण करताच प्रवाशांना विमानाच्या इंजिनमधून आगीच्या ठिणग्या (indigo flight engine caught fire) उडताना दिसल्या. त्यानंतर घाईघाईत या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि या विमानातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E2131 या फ्लाइटमध्ये ही दुर्घटना घडली आहे.

या घटनेनंतर इंडिगोने एक निवेदन जारी केले. त्यांनी आपल्या निवेदनात तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असल्याचं सांगितलं आहे. नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री 10.08 वाजता दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E2131 च्या इंजिनमध्ये आग (indigo flight engine caught fire) लागल्याचा कॉल आला. या विमानात 177 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स होते. विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग लागली. यानंतर लगेचच विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यामुळे आता हे विमान पुन्हा कधी उड्डाण करू शकेल हे सांगता येत नाही.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी स्पाइसजेटच्या विमानातही असाच तांत्रिक बिघाड आढळून आला होता. स्पाइसजेटच्या विमानाने गोव्याहून हैदराबादला उड्डाण केले. हे विमान हैदराबादला पोहोचले होते आणि पायलट लँडिंगच्या तयारीत होते. मात्र त्यानंतर अचानक संपूर्ण विमान धुराने (indigo flight engine caught fire) भरले. यामुळे पायलटला तातडीने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती