हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण विमान प्रवासास प्राधान्य देतात. मागील काही महिन्यापासून देशातील विमान कंपन्या अडचणीत होत्या मात्र आता हळूहळू सर्व काही योग्य मार्गावर होत आहे. त्यातच आता विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Indigo या कंपनीने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे विमान प्रवास आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. Indigo ने नेमका कोणता निर्णय घेतला ते जाणून घेऊयात
इंडिगोचे तिकीट होणार स्वस्त
इंडिगो विमानसेवा ही स्वस्त होणार आहे. इंडिगोने ऑक्टोबर 2023 मध्ये इंधन शुल्क लागू करेल असा निर्णय घेतला होता. इंधनाचे दर कमी झाल्यामुळे इंडिगो त्याचा फायदा आपल्या प्रवाश्यांसाठी करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. इंडिगोने सांगितले की, एटीएफच्या किमती गतिशील असतात. त्यामुळे आमचे भाडे कमी जास्त होत राहते. मात्र असे जरी असले तरी आम्ही आमच्या प्रवाश्यांसाठी परवडणारा प्रवास त्यांना देऊ करू.
का स्वस्त होणार इंडिगोचा प्रवास?
वाहन चालवण्यासाठी इंधनाची व कच्च्या तेलाची आवश्यकता असते. मात्र आर्थिक सूत्रानुसार मागणी वाढली की दर वाढतो आणि मागणी कमी झाली की दर कमी होतो. याप्रमाणेच सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत घटली आहे. त्यामुळे इंडिगोला लागणारे इंधन हे कमी दरात मिळत असून त्याचा फायदा प्रवाश्यांना होणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रती बॅरल 75 डॉलर्सच्या आसपास व्यापार करीत आहे. त्यामुळे विमान इंधनाचे दर कमी झाले आहेत.