जकार्ता । पूर्व इंडोनेशियात शनिवारी पहाटे एका (Ferry) बोटीला आग लागली. या बोटीत क्रू मेंबर्ससह 200 लोकं होते आणि आग लागताच सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्यात उड्या घेतलेल्या शेकडो लोकांना वाचवल्यानंतर हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे.
समुद्री परिवहन महासंचालनालयाचे प्रवक्ते विष्णू वरदाना म्हणाले की, “केएम काम इंदाह नावाची एक बोट लिमाफाटोला बेटावर असलेल्या सनाना बंदराकडे जात होती. आग लागल्याच्या सुमारे 15 मिनिटांनंतर बोटीने आपला प्रवास सुरू केला.” वरदाना म्हणाले की, “22 मुले आणि 14 चालक दल यांच्यासह सर्व 181 प्रवाशांना सुखरुप वाचविण्यात आले. ही आग बोटीच्या इंजिनमध्ये असल्याचे अपघातग्रस्तांनी सांगितले.”
https://twitter.com/PisiKisi/status/1398736155940638723?
आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे इंडोनेशियात बोटीना अपघात होण्याचे प्रमाण सामान्य आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह असलेला राष्ट्र आहे ज्यामध्ये 17,000 पेक्षा जास्त बेटे आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा