‘ते’ वक्तव्य काही इंदुरीकर महाराजांचा पिच्छा सोडेना; अखेर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी काही महिन्यापूर्वी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनातील वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती. दरम्यान, हा वाद मिटला होता. मात्र, आता इंदुरीकर महाराजांना आपलं ते वक्तव्य भोवलंच. महिलाबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत इंदुरीकर महाराजांवर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भास्कर भवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महराज यांच्याविरोधात १९ जून रोजी संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाला आहे.‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ या विधानावरून इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलाम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार अहमदनगर येथील PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीसला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment