मी आत्ताच मुख्यमंत्री आहे- इंदोरीकर महाराज

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी। भाजपची महाजनादेश यात्रा अहमदनगर जिल्ह्यात आली होती. या यात्रेच्या संगमनेर येथील सभेत किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी हजेरी लावली होती. त्यामुळ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात इंदुरीकर महाराज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चेला सुरुवात झाली होती.

मात्र एका कीर्तनात संगमनेरमधून आपण निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा इंदुरीकर महाराजांनी केला. पुरग्रस्तांना मदतनिधी देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर गेलो तर माध्यमांनी विनाकारण वावड्या उठवल्याचं इंदुरीकर म्हणाले. ‘मी आताच मुख्यमंत्री आहे मला उभं राहून काय करायचं?’ असा टोला यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत लगावला. संगमनेर गावातील कसारे गावच्या किर्तनात त्यांनी हा खुलासा केला.

‘इंदुरीकर महाराजांचं यांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा हक्क आहे. त्यावर मी बोलणार नाही. मात्र त्यांनी पत्रक काढून राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उलट त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळ एकप्रकारे त्यांनी मला पाठिंबाच दिला आहे’, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तेव्हा खरं काय आणि खोटं काय, मात्र इंदुरीकर महाराज यांची लोकप्रियता पाहता भविष्यात ते राजकारणात उतरले तर आश्चर्य होणार नाही.