हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indusind Bank : गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ केली. या दर वाढीनंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकांनी आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. यामध्येच उडी घेत आता खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने देखील फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. 21 जूनपासून हे नवे दर लागू केले गेले आहेत.
इथे हे लक्षात घ्या Indusind Bank कडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात बदल केला गेला आहे. या बदलानंतर आता बँकेने काही कालावधीच्या व्याजदरात देखील वाढ केली आहे. त्याचबरोबर आता बँकेच्या सामान्य ग्राहकांना FD वर जास्तीत जास्त 6.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7 टक्के व्याज दिले जाईल.
या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 8 जून 2022 रोजी RBI चे गव्हर्नर असलेल्या शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ जाहीर केली. त्यानंतर आता तो 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांवर आला आहे. याच्या आधी म्हणजेच 4 मे 2022 रोजी देखील RBI ने रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ केलं होती. त्यानंतर तो 4.00 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांनी आणला गेला होता. Indusind Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indusind.com/in/en/personal/deposits/fixed-deposit.html
हे पण वाचा :
Multibagger Stocks : प्लॅस्टिक पाईप बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Gold investment : अशा प्रकारे स्वस्तात खरेदी करता येईल सोने !!!
EPF खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा प्रकारे घर बसल्या बदला !!!
Share Market : ‘या’ Paints कंपन्यांच्या शेअर्सनी 3 वर्षात पैसे केले दुप्पट !!!
ICICI Bank कडून 6 दिवसात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ, सुधारित दर जाणून घ्या