नवी दिल्ली । देशातील औद्योगिक उत्पादनाला पुन्हा एकदा वेग आला आहे. डिसेंबरमध्ये घसरण होऊनही जानेवारीमध्ये औद्योगिक उत्पादन 1.3 टक्क्यांनी वाढले. या आधीच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2021 मध्ये ते 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले होते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
औद्योगिक उत्पादनाचे मोजमाप IIP (Index of Industrial Production) द्वारे केले जाते. सरकारी आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन 0.4 टक्क्यांनी वाढले आहे तर वर्षभरापूर्वी जानेवारी 2021 मध्ये त्यात 0.6 टक्क्यांची घट झाली होती.
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरही वाढले
जानेवारीमध्ये मायनिंग सेक्टरचे उत्पादन 2.8 टक्क्यांनी वाढले, तर डिसेंबर 2021 मध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. त्याच वेळी, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे उत्पादन जानेवारीमध्ये 1.1 टक्क्यांनी वाढले, तर मागील महिन्यात ते 0.9 टक्क्यांनी घसरले.
जानेवारीत वीजनिर्मिती मंदावले
दरम्यान, जानेवारीमध्ये वीजनिर्मितीचा वेग मंदावला आणि डिसेंबरमध्ये 2.8 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत केवळ 0.9 टक्के वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जानेवारी या कालावधीत IIP ची वाढ 13.7 टक्के आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत 12 टक्क्यांनी घसरली होती.
मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला आणि त्यानंतर 18.7 टक्के घट झाली. एप्रिल 2020 मध्ये, लॉकडाऊनमुळे 57.3 टक्क्यांची मोठी घसरण झाली.