नवी दिल्ली । डिसेंबर 2021 मध्ये देशातील औद्योगिक उत्पादनात 0.4 टक्के वाढ झाली आहे. मात्र, इंडस्ट्रियल प्रोडक्शन इंडेक्स (IIP) वाढीचा दर 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर राहिला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी आपली अधिकृत आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार, यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये IIP वाढीचा दर 1.3 टक्के होता.
वीज निर्मितीत 2.8 टक्के वाढ
NSO ने जारी केलेल्या IIP आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे प्रोडक्शन 0.1 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, मायनिंग सेक्टरचे प्रोडक्शन 2.6 टक्क्यांनी वाढले तर वीज उत्पादनात 2.8 टक्के वाढ नोंदवली गेली.
एक वर्षापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये IIP चा विकास दर 2.2 टक्के होता. NSO च्या मते, IIP एप्रिल-डिसेंबर 2021 या कालावधीत 15.2 टक्क्यांनी वाढला आहे, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 13.3 टक्क्यांनी वाढला होता.
कोविड-19 महामारीचा औद्योगिक उत्पादनावर परिणाम
कोविड-19 महामारी आणि त्याच्या प्रतिबंधासाठी लादलेल्या निर्बंधांमुळे औद्योगिक उत्पादनावर विपरित परिणाम झाला. मार्च 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन 18.7 टक्क्यांनी घसरले आणि एप्रिल 2020 मध्ये ते 57.3 टक्क्यांवर आले.
DECEMBER 2021 NOVEMBER 2021 DECEMBER 2020
IIP growth 0.4% 1.3% 2.2%
Mining 2.6% 4.9% -3.0%
Manufacturing -0.1% 0.8% 2.7%
Electricity 2.8% 2.1% 5.1%