Infinity Forum : फिनटेक उपक्रमांना फिनटेक क्रांतीमध्ये बदलण्याची वेळ: पंतप्रधान मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फिनटेकवरील Infinity Forum चे उद्घाटन केले. देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह अनेक प्रमुख व्यावसायिक व्यक्ती या Infinity Forum मध्ये सहभागी होत आहेत. जगभरातील व्यवसाय आणि तंत्रज्ञानातील प्रतिभांना एकत्र आणणे हा या Forum चा उद्देश आहे.

इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटी (IFSCA) द्वारे भारत सरकारच्या नेतृत्वाखाली Infinity Forum चे आयोजन केले जात आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT-सिटी) आणि ब्लूमबर्ग या कार्यक्रमात सहकार्य करत आहेत. या दोन दिवसीय कार्यक्रमात 70 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

Infinity Forum मधील प्रमुख वक्त्यांमध्ये मलेशियाचे अर्थमंत्री तेंगकू जफरुल-अजीझ, इंडोनेशियाचे अर्थमंत्री मुल्यानी इंद्रावती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, कोटक महिंद्रा बँक लि.चे एमडी आणि सीईओ उदय कोटक, सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सोफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनचे चेअरमन सीईओ मासायोशी सून ,आयबीएम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अरविंद कृष्णा यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींचा सहभाग आहे.

फिनटेक क्रांतीचा काळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की,”आपले अनुभव आणि कौशल्य जगासोबत शेअर करण्यात आणि त्यांच्याकडून शिकण्यावर आमचा विश्वास आहे. आमचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स जगभरातील नागरिकांचे जीवन सुधारू शकतात. या फिनटेक उपक्रमांचे फिनटेक क्रांतीमध्ये रूपांतर करण्याची हीच वेळ आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत करणारी क्रांती.”

Infinity Forum
यावेळी Infinity Forum चा अजेंडा ‘बियॉन्ड’ या विषयावर केंद्रित आहे. या अंतर्गत अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. या Infinity Forum चे उद्दिष्ट धोरण, व्यवसाय आणि तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावरील प्रतिभेला एकत्र आणणे आणि फिन-टेक उद्योगात तंत्रज्ञान आणि नावीन्य आणणे आहे.

Leave a Comment