साहेब फक्त निवडणुकीचा काळ असतानाच पावसात भिजतात; सदाभाऊ खोतांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. अशात भाजपकडून आता पावसाच्या नुकसानीवरून व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावरून पवार-ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाहू खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे. “साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला. पण पावसाला तरी कुठे माहित आहे साहेब फक्त निवडणुकीचा काळ असतानाच पावसात भिजतात,” असे खोत यांनी म्हंटले आहे.

सदाभाऊ खोत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला. पण पावसाला तरी कुठे माहित आहे साहेब फक्त निवडणुकीचा काळ असतांनाच पावसात भिजतात बाकी वेळेस साहेबांकडे छत्री उपलब्ध असते,” असा टोला खोत यांनी लगावला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आपल्या तीन दिवसाच्या मुंबई दौऱ्यात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार , शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्याचबरोबर ममता यांनी मुंबईतील उद्योगपतींच्याही भेटीगाठी घेतल्या आहेत. ममताच्या या दौऱ्याची आणि शरद पवारांच्या भेटीची चांगलीच चर्चा होत आहे. यावरून भाजपनेत्यांकडून टीका केली जात आहे.

You might also like