Infosys कंपनीने Q3 मध्ये दिली 6,000 फ्रेशर्सना संधी; FY23 च्या अखेरीस 50,000 फ्रेशर्सना कामावर घेणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जगभरात सध्या मंदीचे सावट घोंगावत आहे. मात्र IT सेक्टरमधील मोठी कंपनी असलेल्या Infosys ने मात्र फ्रेशर्सना कामावर घेण्याचा सपाटा लावला आहे. Infosys कंपनीने तिसऱ्या तिमाहीत एकूण तब्बल 6000 फ्रेशर्सना कामावर रुजू केले आहे. 2023 हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कंपनी एकूण 50 हजार फ्रेशर्सना कामावर रुजू करण्याचे आपले ध्येय पूर्ण करणार आहे.

इन्फोयसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी कंपनीच्या फ्रेशर्सना रुजू करण्याच्या धोरणाबाबत माहिती दिली आहे. आमची कंपनी या वर्षीचे Annual Projection पूर्ण करेलच परंतु फ्रेशर्सना रुजू करण्याची प्रक्रियाही आम्ही सुरु ठेवणार आहोत. 2023 हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत आम्ही आमचे 50 हजार फ्रेशर्सना रुजू करण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू असे रॉय यांनी सांगितले आहे.

सध्या इन्फोयसिस मध्ये अनेक नव्याने रुजू झालेले फ्रेशर्स मैसूर येथे प्रशिक्षण घेत आहेत. उद्या हेच फ्रेशर्स कंपनीला पुढे घेऊन जातील अशा आम्हाला विश्वास आहे. आम्ही फ्रेशर्सला चांगल्या दर्जाचं प्रशिक्षशन देऊन तयार करत आहोत. आम्ही असं समजतो कि आम्ही हि एक प्रकारची भविष्यासाठी गुंतवणूक करत आहोत असं मत नीलांजन रॉय यांनी व्यक्त केले.

दरम्यान, Infosys ने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 21,171 लोकांची भरती केली होती. त्यानंतर Q2 मध्ये निम्म्याहून अधिक लोकांची भरती कमी करून 10,032 जणांची तर Q3 मध्ये कंपनीने केवळ 1,627 जणांची नव्याने भरती केली होती. मात्र आता कंपनीने 6000 फ्रेशर्सना कामावर घेऊन 40 हजार फ्रेशर्सला कामावर घेण्याचा टप्पा गाठला आहे. जगभरात मंदीचे सावट असताना इन्फोयसिसने केलेल्या या भरतीमुळे IT क्षेत्रात एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.