हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर संदर्भात नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी येत्या 15 जानेवारीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हयात शस्त्र बाळगणे, परवानगी विना 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने हा निर्णय जिल्हयातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी घेतला आहे.
मुख्य म्हणजे, 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमण्यासाठी, सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वाजविण्यास वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांना असणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमध्ये हे आदेश 15 जानेवारी पर्यंत कायम राहणार आहेत. याकाळात कोणत्याही भागात मोर्चे, आंदोलन, धरणे आंदोलन किंवा बैठका घेण्यास मनाई असेल. असे करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल.
दरम्यान, मागील काही काळापासून संभाजीनगर जिल्ह्यात अनेक कारणांसाठी मोर्चे आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे अशा काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी त्याकरिता हे नियम घालण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे, या नियमांचे पालन न केल्यास त्या व्यक्तींवर कठोर कारवाई देखील केली जाणार आहे.