लातुर कारागृहातील कैद्याची शाैचालयात गळफास घेऊन आत्महत्या

Sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर येथील येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्याच्याविराेधात निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी पाेलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लातूरच्या जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बजरंग शेषेराव पवार याने कारागृहातील शाैचालयातच गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे.

मृत बजरंग पवार आणि त्याचा चुलत भाऊ हे कलम ३७६ व पाेस्काेअंतर्गत लातूर जिल्हा कारागृहात १५ जूनपासून बंदिस्त हाेते. यावेळी आपण या गुन्ह्यातून लवकर बाहेर पडू शकणार नाही असे मृत बजरंग पवारला सतत वाटत होते. यामधून त्याच्यामध्ये नैराश्य आले. आणि याच नैराश्यातून त्याने शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शाैचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.

टाॅवेल फाडून तयार केला दाेर
बजरंग पवार हा मागच्या आठ दिवसांपासून आपल्या भावाशी फारसे काही बाेलत नव्हता. मात्र, आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातून लवकर बाहेर पडणे आता शक्य नाही, असे त्याला सतत वाटत होते. यामुळे तो नैराश्यात गेला होता. यातूनच बजरंग याने आपल्या कमरेला असलेले टावेल शाैचालयात गेल्यानंतर फाडले आणि त्यापासून दाेर तयार करत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अशी माहिती लातूर येथील कारागृह अधीक्षक राहुल झुटाळे यांनी दिली आहे.