सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सूटल्याने अपघात झाला. यावेळी कारमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळून गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने जाधव कुटूंबीय त्यांच्या इनोव्हा कार क्रमांक एमएच 14 डीएफ 6666 मधून निघाले होते. त्यांची कार खंबाटकी बोगद्याजवळ आली असता. कारमधील चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली.
— santosh gurav (@santosh29590931) January 30, 2023
कारचा अपघात झाल्याने तेथून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी या अपघाताची माहिती तात्काळ भुईंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच पोलीस रुग्णवाहिकेला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी मृत पावलेल्या व जखमींना तात्काळ शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.