व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

INS विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील; मोदींच्या हस्ते अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारतीय नौदलासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. केरळ येथे पहिल्या स्वदेशी कोची शिपयार्ड लिमिटेड येथे भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. आयएनएस विक्रांत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार आहे, असं विधान यावेळी मोदींनी केलं. मोदींच्या हस्ते यावेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचंही अनावरण करण्यात आलं. नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करत असल्याचं मोदींनी म्हटलं.

यावेळी मोदी म्हणाले, विक्रांत विशालआहे, विराट आहे. विक्रांत विशिष्ट आहे, विक्रांत खास आहे. विक्रांत ही केवळ युद्धनौका नाही. 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा हा पुरावा आहे. समुद्र आणि आव्हाने अनंत असतील तर भारताचे उत्तर विक्रांत आहे. विक्रांत हे स्वावलंबी भारताचे अनोखे प्रतिबिंब आहे… असेही मोदी म्हणाले.

मोदींनी यावेळी नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरणही केले. नौदलाच्या आधीच्या ध्वजावर पूर्वी गुलामगिरीचे प्रतीक होते, ते आम्ही काढून टाकले आहे असे म्हणत हा नवीन नौदल ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करतो असं मोदींनी म्हंटल.