प्रेरणादायक ! रुग्णाला वाचवण्यासाठी ऑपरेशनआधी खुद्द डॉक्टरनेच केलं रक्तदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनच्या काळात अनेक वेळा संकटाचा सामना करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठीसुद्धा कोणी कोणाच्या कमी येत नाही. परंतु जगात अशी अनेक लोक आहेत कि ते सामाजिक भान ठेवत , माणसातील माणुसकी जपत देवदूतासारखे मदतीला धावून येत आहेत. असाच एक डॉक्टर देवदूत कि त्याने आपले रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचावला आहे.

दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एक रुग्णाची प्रकृती खूपच चिंताजनक होती. या रुग्णावर शस्त्रक्रीया करण्यासाठी तातडीने रक्ताची गरज होती. मात्र त्याला कोणीच रक्तदाता मिळत नव्हता. रक्तदाता शोधेपर्यंत खूप वेळ निघून गेला असता अखेरच येथील उपस्थित असलेल्या एका निवासी डॉक्टरनेच आधी या व्यक्तीसाठी रक्तदान केलं आणि त्यानंतर या व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रीया झाली. डॉक्टर मोहम्मद फवाज असे त्या डॉक्टरांचे नाव आहे . आणि त्याचे वय आहे अवघे २४ वर्ष आहे.

एम्सधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘मंगळवारी एका तीस वर्षीय असणाऱ्या युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या रुग्णाच्या डाव्या पायाला जखम झाली होती. यामुळे झालेल्या जंतूसंसर्गामुळे पायाला बरीच दुखापत झाली होती. त्यामुळेच डॉक्टरांनी तातडीने या रुग्णावर शस्त्रक्रीया करण्याचे ठरवले. परंतु रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये पुरेश्या प्रमाणामध्ये रक्ताचा साठा नसल्याने, रुग्णावर शस्त्रक्रिया शक्य नव्हती. फवाजने घेतलेल्या निर्णयामुळे लवकर रक्त उपलब्ध होऊ शकलं. हिमोग्लोबीन कमी असल्याने शस्त्रक्रीयेदरम्यान रक्तदाब नियंत्रणात रहावा म्हणून आधी रुग्णाला ब्लड ट्रान्सफ्युजनच्या मदतीने रक्त देण्यात आलं आणि व्हेंटीलेटरच्या मदतीने त्याला ऑक्सीजन पुरवण्यात आला. तीन ते चार वेळा ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यात आलं’.

” हा व्यक्ती पत्नीसोबत आला होता. पण पत्नीची तब्बेत ठीक नसल्याने ती रक्तदान करू शकत नव्हती. रक्ताची वाट पाहण्यासाठी तितका वेळ नव्हता म्हणून मी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला . सध्याच्या महामारीच्या कालावधीमध्ये लोकांना मदत मिळत नाही. डॉक्टरांचा मुख्य हेतू हा रुग्णाचा जीव वाचवण्याचा असतो. रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम उपचार मिळाले पाहिजेत असं मला वाटतं,” असं फवाज सांगतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.