Bank Loan : अल्प मुदतीचे कर्ज घेण्याआधी त्यामधील ‘या’ 3 धोक्यांविषयीची माहिती जाणून घ्या

Bank Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Loan : आपल्या आयुष्यात आपल्याला आणीबाणीच्या प्रसंगी अनेकदा पैशांची गरज भासते. अशावेळी आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले जाते. अशा वेळी शॉर्ट टर्म लोन हा पैशांची व्यवस्था करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जवळपास सर्वच बँकांकडून अल्प मुदतीसाठी कर्ज दिले जाते. मात्र हे जाणून घ्या कि, अशा प्रकारचे कर्ज सहज उपलब्ध होत असले तरीही त्याची परतफेड करताना तितकाच घाम फुटतो. त्यामुळे जेव्हा कधी आपण आपत्कालीन परिस्थितीत अशा प्रकारचे कर्ज घेणार असाल तेव्हा त्याबाबत अत्यंत सावधगिरी बाळगा.

Need cash? Loan against fixed deposits is cheaper than a personal loan |  Business Standard News

पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड वर घेतलेले कर्ज, ओव्हरड्राफ्ट आणि ब्रिज लोन हे सर्व शॉर्ट टर्म लोनच्या श्रेणीत येतात. हे एक अनसिक्‍योर्ड लोन आहे आणि याच्या परतफेडीचा कालावधी सहा महिने ते एक वर्षापर्यंतचा असतो. हे लोन (Bank Loan) त्वरित मंजूर केले जाते. याला ‘टू मिनिट लोन’ असेही म्हंटले जाते. यामध्येही अनेक प्रकारचे धोके आहेत. चला तर मग त्याविषयीची माहिती जाणून घेऊयात…

Face DIFFICULTY in getting personal loans? Here are 9 TIPS to increase the  chances | Personal Finance News | Zee News

द्यावे लागेल जास्त व्याज

हे जाणून घ्या कि, बँकांकडून इतर कर्जांच्या तुलनेत अल्प मुदतीच्या कर्जासाठी जास्त व्याजदर आकारला जातो. यामुळेच हे कर्ज घेणार्‍या व्यक्ती डिफॉल्टर होण्याची शक्यताही जास्त असते. तसेच व्याजाची माहिती नसताना अल्प मुदतीचे कर्ज घेणे हे अतिशय धोकादायक ठरू शकेल. Bank Loan

banks: Bank loan: How to write your business plan - The Economic Times

जास्त EMI

अशा प्रकारच्या कर्जाचा कालावधी कमी असतो. ज्यामुळे त्याची परतफेड करण्यासाठी दरमहा जास्त EMI भरावा लागेल. ज्यामुळे लोकांचे बजेट बिघडते. यामुळे लोकांकडून कर्ज बुडवले जाते आणि त्यांना दंड भरावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोझा आणखी वाढतो. Bank Loan

Follow these steps to repay your personal loan quickly

मोठा दंड

अल्पमुदतीच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले गेले नाही तर बँकेकडून यासाठी मोठा देखील दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे त्याची परतफेड करताना आणखी अडचणी निर्माण होऊ लागतील. अशा परिस्थितीत, अशा प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करण्याआधी त्याच्याशी संबंधित सर्व अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे ठरेल. याबरोबरच आपल्याकडे या कर्जाचे प्रीपेमेंट करण्याचा पर्याय आहे का ते देखील तपासा. Bank Loan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/learning-centre/sme/what-is-short-term-loan-and-its-benefits

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर आज पुन्हा घसरले, तपासा आपल्या शहरातील आजचे दर
SBI ने प्राइम लेंडिंग रेट अन् बेस रेटमध्ये केली 70 bps ने वाढ, ‘या’ ग्राहकांना बसणार फटका
BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन, 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत
फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा
देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट