टीम, HELLO महाराष्ट्र – संतांनप्राप्तीसाठी अनेक जोडपे प्रयत्न करत असतात. परंतु लो फर्टिलिटीमुळे संतानसुखापासून लांब राहावे लागते. त्यामुळे नैराश्य देखील येते . फर्टीलिटीची क्षमता वाढवण्यासाठी जीवनशैली आणि खानपानामध्ये देखील काही बदल करणे आवश्यक आहे. फॉलीक ऍसिड म्हणजे बी व्हिटॅमिन युक्त पदार्थांचे सेवन केल्याने फर्टीलिटीची समस्या कमी होते .
पुरुषांमध्ये फॉलीक ऍसिडची कमी आल्याने स्पर्म मध्ये डीएनए स्टॅबिलिटी कमी होते . फॉलिक ऍसिड सेल डिव्हिजन आणि डीएनए निर्मिती मध्ये मदत करतात . तर महिलांमधील फॉलीक ऍसिडची कमी संततीच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करू शकते . गर्भधारणेपूर्वी आणि नंतर फॉलीक ऍसिड युक्त पदार्थांचे सेवन अत्यंत महत्वाचे आहे . अन्यथा न्यूरल ट्युब मध्ये दोष निर्माण होऊ शकतो . तसेच बाळामध्ये गंभीर आजार जन्मतः उद्भवू शकतात .
फॉलिक ऍसिडसाठी करा या पदार्थांचे सेवन
बादाम , एव्होकाडो,पालक,संत्री ,भात ,ब्रसेल्स स्प्राउट्स,ब्रोकली,पोपई ,शेंगदाणे