नवी दिल्ली । भारत-चीन सीमावादानंतर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केल्यांनतर राजीव गांधी फाउंडेशनच्या फंडींग वरून भाजपने काँग्रेसवर पलटवार केला होता. राजीव गांधी फाउंडेशनला 2005-06 दरम्यान चीनकडून झालेल्या फंडिंग बाबत भाजपने प्रश्न उपस्थित केले होते, आता याप्रकरणी गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे.
ही समिती गांधी कुटुंबियांचा संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या सर्व संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे. ईडीचे स्पेशल डायरेक्टर या समितीचे प्रमुख असणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
राजीव गांधी फाऊंडेशनवरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल चढवला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गांधी कुटुंबियांवर निशाणा साधला. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले? असा सवाल विचारला. तसेच आणखी 10 प्रश्न जेपी नड्डा यांनी विचारले होते.
कोरोनामुळे किंवा चीनमधील परिस्थितीमुळे मूळ प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करु नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि देशांच्या सीमांचे रक्षण करण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देश सुरक्षित आहे. देशातील जनतेला हे जाणून घ्यायचं आहे की, सत्तेत असताना कॉंग्रेसने काय केलं? देशातील नागरिकांचा कसा विश्वासघात केला? हे सोनिया गांधी यांनी सांगावं, असं जेपी नड्डा यांनी म्हटलं.
राजीव गांधी फाऊंडेशन आणि चीनचा काय संबंध? फाऊंडेशनचा कारभार आरटीआय अंतर्गत का नाही? पंतप्रधान फंडातून राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले होते? मेहूल चोकसीला कर्ज का दिलं? राजीव गांधी सरकाराला चीनकडून पैसे का मिळाले? चीनसोबतचे व्यवहार का वाढवले? असे अनेक प्रश्न जे. पी. नड्डा यांनी उपस्थित केला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”