बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : जातीअंताचा लढा लढायचा आणि जिंकायचा असेल तर आंतरजातीय विवाह हा महत्वाचा मार्ग असल्याचे डॉ. आंबेडकरांनी सांगितले. फुले-शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचा समाज उभा करण्यासाठी जातीच्या पलीकडे समाजाने गेले पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेऊन आश्लेषा आणि योगेशने फक्त 1100 रुपयांत आंतरजातीय विवाह करून एक आदर्श पायंडा पाडला आहे. निर्धार सेवाभावी संस्थेकडून हा विवाह लावण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा चौंदरमल यांची लहान बहिण अश्लेषा आणि योगेश जाधव या दोघांनी आंतरजातीय विवाह करत एकमेकांचा आनंदाने स्वीकार केला. बौद्ध पद्धतीने हा विवाह झाला. अगदी ११०० रूपयात आणि मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीने हा विवाह पुण्यात संपन्न झाला. दोघेही एकमेकांना ३ वर्षापासून ओळखत होते. दोघेही एकमेकांसोबत रहात असल्याने स्वभाव, आवडी निवडी एकमेकांच्या समजून घेणारे, घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आणि त्या परिणामांची जबाबदारी दोघेही स्वीकारणारे असल्याने दोघेही एकमेकांसोबत आनंदी दिसले. यामुळे अर्थात दोघेही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहील्याने आज आम्ही हा विवाह लाऊन दिला.बाकी लोक काय म्हणतील?नातेवाईक काय म्हणतील याचा विचार आताची ही पिढी करत नाही.आणि कोणत्याही धर्मातील चालीरीती रुढी परंपरा या माणसापेक्षा कधीच मोठ्या नसतात.मला वाटतं जातियता नष्ट करणारे असे तरुणच पुरुषप्रधान व्यवस्था नष्ट करण्याचं ही काम करतील.जातियता नष्ट व्हावी आणि आँनर क्राईम होत मुलांचे जीव जाऊ नयेत म्हणून सत्यभामा सौंदरमल, नारायण डावरे हे निर्धारचे कार्यकर्ते नेहमीच पुढाकार घेतात. अश्लेषा सौंदरमल या सत्यभामा सौंदरमल यांच्या सख्या भगिनी आहेत.
अशा युवक युवतींना पोलीस संरक्षण तातडीने मिळण्याची गरज आहे अशी अपेक्षा यावेळी परिवर्तन वादी कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी व्यक्त केली .