हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया म्हणून ओळखली जाते. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपले स्वप्न पूर्ण करतोच. तसेच येथे येणारा कोणताही व्यक्ती उपाशी झोपत नाही. रोजगाराने भरलेल्या मुंबईत इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल्सची आता भर पडणार आहे. मुंबईत मंगळवारपासून ग्लोबल मॅरिटाइम इंडिया समेट सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या समेटचे उदघाटन करण्यात आले आहे. त्यामध्ये समुद्री व्यापाराच्या विषयाबरोबरच व्यापार वाढवण्यासाठी तसेच रोजगाराचे चित्र डोळ्यासमोर ठेऊन मुंबईत इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल्स बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि तो पासही झाला.
61 हजार कोटींचा प्रोजेक्ट
जवाहरलाल पोर्ट ट्रस्टने हा प्रस्ताव मांडला आणि 61 हजार कोटी रुपयाचा बंदर मुंबई नजिकच्या पालघर वाढवनमध्ये बांधण्यात यावा असे ठरले. हा करार एकूण 3 कंपन्यासोबत केला आहे. सुमुद्र किनारा, बंदर व्यापार ह्यासारख्या तसेच जहाजांची निर्मिती ही वाढत असून भारत हा क्रूझ हब होण्याच्या मार्गावर आहे. आणि त्यामध्ये खारीचा वाटा हा मुंबईत होणाऱ्या इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल्सचा आहे. कारण ह्यामुळे पर्यटनास व रोजगारास चालना मिळणार आहे.
काय असेल ह्याची खासियत?
ह्या बंदरात 1-1 किलोमीटर असे एकूण 9 टर्मिनल असतील. महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्रकिणारा लाभला असून ह्या बंदरावरून दरवर्षी सुमारे 200 क्रूझ जहाजे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबईत रोजगाराला चालना मिळेल असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले आहे. 2024 पर्यंत हे क्रूझ टर्मिनल्स बांधून होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बंदरावरचा व्यापार वाढवण्यासाठी तसेच रोजगार निर्मिती करण्यासाठी ह्या मार्गांवरील रस्ते वाहतूक मार्ग चांगले बनवण्याचेही काम हाती घेतले आहे.मुंबईत सध्या एकूण 2 बंदरे आहेत. जे की समुद्री व्यापार पाहतात. त्यातील JNPT हे बंदर मुंद्रा बंदरानंतर भारतातील दुसरे सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. मात्र हे बंदर मुंबईच्या अगदीच जवळ असल्या कारणाने समुद्री व्यापार हा अल्प प्रमाणात होतो. त्यासाठी ह्या नवीन प्रोजेक्टचा घाट घातला गेला आहे.