हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनमधील यूबेई प्रांतातील वुहान शहरातील मूळ असलेला ‘करोना’ विषाणू (Coronavirus) हळूहळू जगभर पसरत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. चीनमध्ये आतापर्यंत २१३ बळी कोरोना विषाणूने घेतला असून जवळपास १० हजार जणांना या रोगाची लागण आहे. झालेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organisation – WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
अनेक देशांत ‘करोना’बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळं सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना चीनमध्ये न जाण्याचं आवाहन केलं आहे. तर, काही देशांनी चीनमधून येणाऱ्या नागरिकांवर प्रवेशबंदी केली आहे. जागितक आरोग्य संघटनेला कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची चिंता सतावत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव चीनमधून झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचा फक्त एक रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आरोग्य संस्था असलेल्या ‘हू’नं सुरुवातीला ‘करोना’चा धोका मोठा नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन आपली भूमिका बदलली आहे. ‘करोना’ला अटकाव करण्यासाठी जगभर आणीबाणी घोषित केली आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
श्रीनगर महामार्गावरील चकमकीत ३ दहशतवादी ठार; चकमक अजूनही सुरु
तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ सिनेमाचा पोस्टर रिलीज; प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद
1965 मध्ये बजाज ग्रुपची धुरा हातात घेतलेले राहुल बजाज आता कंपनीला करणार ‘रामराम’