Tuesday, February 7, 2023

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये करा गुंतवणूक आणि मिळवा लाखोंचे व्याज!

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करणे जास्त योग्य वाटते, त्यांच्यासाठी पोस्टामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. पोस्टामध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका गुंतवणूकदाराला सहन करावा लागत नाही. कारण, या योजना सरकार घोषित करत असते. या योजनांवर चांगल्या प्रकारचे व्याज मिळू शकते. सोबतच आपली मुद्दल तशीच राहते. या योजनांमध्ये एक योजना आहे, जी गुंतवणूकदारास चांगला फायदा मिळवून देऊ शकते. या योजनेचे नाव नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC) म्हणजेच राष्ट्रीय बचत पत्र असे आहे.

बचतीसाठी आणि उत्तम रिटर्नसाठी राष्ट्रीय बचत पत्र ही योजना उत्तम मानली जाते. ही पाच वर्षासाठीची योजना आहे. म्हणजेच, हिचा मॅच्युरिटी पिरेड पाच वर्षाचा आहे. 1 एप्रिल 2020 पासून व्याजदर 6.8 टक्के निश्चित केला आहे. आपण या स्कीममध्ये एक हजार रुपये जमा केले तर, पाच वर्षाच्या नंतर तुम्हाला 1389.49 रुपये प्राप्त होतील. या योजनेमध्ये खाते उघडताना किमान एक हजार पासून, हवी तितकी रक्कम जमा करू शकता. जमा करण्यात येणारी रक्कम ही एक हजारच्या पटीमध्ये असावी.

- Advertisement -

एनएससीमध्ये छोट्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. अगदी शंभर रुपयापासून गुंतवणूक करता येते. एनएससी आपल्या अकाउंट होल्डरला गॅरेंटीमध्ये रिटर्न सुविधा देते. सोबतच रेगुलर उत्पन्नासाठी एक स्त्रोत बनू शकते. या स्कीममध्ये मॅच्युरिटी पिरेडनंतर संपूर्ण पैसे गुंतवणूकदाराला परत केले जातात. या रकमेवरती कुठलाही टीडीएस कापला जात नाही. म्याचुरीटी पिरियडपूर्वी पैसे काढता येत नाहीत. परंतु गरज असल्यास या रकमेवर कर्ज काढता येते. या योजनेला नॉमिनी सुद्धा देता येतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.