हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC च्या विमा पॉलिसी मधून बचत आणि संरक्षण दोन्ही मिळते. ज्यामुळे LIC च्या पॉलिसी लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. LIC ची जीवन लाभ योजना देखील अशीच एक पॉलिसी आहे, ज्यामध्ये मॅच्युरिटी बेनेफिट आणि डेथ बेनेफिट दोन्ही उपलब्ध आहेत.
या योजनेमधील गुंतवणुकीसाठीचे किमान वय फक्त 8 वर्षे आहे. म्हणजेच कोणत्याही अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने ही पॉलिसी घेता येऊ शकेल. तसेच या योजनेमधील गुंतवणुकीसाठीचे जास्तीत जास्त वय 59 वर्षे आहे. ही पॉलिसी 16 ते 25 वर्षांच्या कालावधीसाठी घेता येऊ शकेल. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसीची मुदत 21 वर्षे निवडली तर पॉलिसी घेताना त्याचे वय 54 वर्षांपेक्षा कमी असायला हवे. त्याच वेळी, 25 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी व्यक्तीची वयोमर्यादा 50 वर्षे आहे. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 75 वर्षे आहे. तसेच पॉलिसीच्या मुदतीदरम्यान जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला पूर्ण लाभ मिळेल. यामध्ये नॉमिनीला बोनससोबतच विम्याची रक्कमही दिली जाईल.
अशा प्रकारे वाढतील पैसे
जर आपले वय 25 वर्षे असेल आणि आपण 25 वर्षांच्या मुदतीसाठी ही पॉलिसी घेतली असेल तर यामध्ये आपल्याला मूळ विमा रक्कम म्हणून 20 लाख रुपये निवडावे लागतील. अशा प्रकारे आपला वार्षिक प्रीमियम 86,954 रुपये होईल. म्हणजेच, दररोज सुमारे 238 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जेव्हा तो 50 वर्षांचा होईल किंवा पॉलिसी 25 वर्षांसाठी मॅच्युर होईल, तेव्हा नॉर्मल लाइफ कव्हर बेनिफिट अंतर्गत, 54.50 लाख रुपये मिळतील.
4 प्रकारे प्रीमियम भरता येईल
या पॉलिसीचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरता येतो. जर मासिक प्रीमियम भरला तर दरमहा.5,000 रुपये भरावे लागतील. त्रैमासिक भरल्यास प्रीमियम 15,000 रुपये असेल. सहामाही प्रीमियम भरल्यावर 25000 रुपये भरावे लागतील आणि जर वर्षातून एकदाच प्रीमियम भरला तर 50,000 रुपये भरावे लागतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/Jeevan-Labh
हे पण वाचा :
SBI ने ग्राहकांसाठी सुरु केली Whatsapp बँकिंगची सुविधा !!!
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा कमाईची संधी !!!
Canara Bank कडून FD वरील व्याज दरात बदल !!! नवीन दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल !!! नवीन दर तपासा
Gold Investment : सोन्यामध्ये अशाप्रकारे गुंतवणूक करून मिळवा भरपूर पैसे !!!