हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : भविष्यासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो. विशेषतः रिटायरमेंटसाठी लोकांसाठी गुंतवणूक केली जाते. त्यामुळे रिटायरमेंटच्या वेळी पैशांची कमतरता भासू नये म्हणून लवकरात लवकर गुंतवणूक करणे हाच योग्य मार्ग आहे. मार्केटमधील अनेक तज्ञ देखील लोकांना शक्य तितक्या लवकर गुंतवणूक करण्यास सांगतात. त्याबरोबरच ही गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी असावी असाही सल्ला तज्ञांकडून दिला जातो.
मात्र गुंतवणुक करताना हे लक्षात घ्या कि गुंतवणुक अशा ठिकाणी करावी जिथे कंपाउंडिंगचा फायदा मिळेल. कंपाउंडिंग म्हणजे चक्रवाढ. कंपाउंडिंगमुळे आपल्या गुंतवणूकीमध्ये अनेक पटींनी वाढ होऊ शकते. हे आपण खाली दिलेल्या उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. समजा 3 लोकं आहेत ज्यांनी वेगवेगळ्या वयात गुंतवणूक करायला सुरुवात केली. यामधील एकाने वयाच्या 25 व्या वर्षी, दुसऱ्याने वयाच्या 35 व्या वर्षी तर तिसऱ्याने वयाच्या 40 व्या वर्षी सुरुवात केली आणि त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करणे सुरु ठेवले. आता आपण असे समजूयात की, या तिघांनीही 5000 रुपयांची मासिक गुंतवणूक केली आणि त्यांना 8 टक्के वार्षिक रिटर्न मिळाला. Investment
कोणाला किती नफा मिळाला ???
आता अशा प्रकारे गुंतवणूक करून 25 वर्षे वय असलेल्या व्यक्तीचे 35 वर्षांपर्यंत एकूण 21 लाख जमा झाले होतील. यासाठी 8 टक्के वार्षिक रिटर्न मिळाला. ज्यामुळे गुंतवणूक 1.2 कोटी रुपयांपर्यंत वाढली म्हणजेच 94 लाख रुपयांचा नफा मिळाला. तसेच 35 वर्षीय व्यक्तीने 25 वर्षांसाठी 15 लाख रुपये गुंतवले आणि त्याला एकूण 48 रुपये मिळाले. म्हणजेच त्याला 33 लाख रुपयांचा नफा मिळाला. तर 40 वर्षीय व्यक्तीने 20 वर्षात 12 लाख रुपये जमा केले आणि एकूण 30 लाख रुपये मिळाले. त्याला 18 लाख रुपये नफा मिळाला. जर टक्केवारी नुसार मोजले तर पहिल्या व्यक्तीला 450 टक्के, दुसऱ्याला 220 टक्के आणि तिसऱ्याला 150 टक्के रिटर्न मिळाला. अशा प्रकारे चक्रवाढीचा फायदा मिळतो. Investment
कंपाऊंडिंग कसे असते ते समजून घ्या
कंपाउंडिंग म्हणजे चक्रवाढ… चक्रवाढ म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर मिळालेली रक्कम पुन्हा पुन्हा गुंतवणे. यामध्ये फक्त मूळ रकमेवरच नाही तर व्याजावरही व्याज दिले जाते. अशा प्रकारे चक्रवाढ करून गुंतवणूक झपाट्याने वाढवता येते. यासाठी SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये देखील गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय आहे.
गुंतवणूक कुठे करावी ???
नॅशनल पेन्शन सिस्टम, फिक्स्ड डिपॉझिट्स, पीपीएफ, सरकारी बॉण्ड्स, इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड यामध्ये आपल्याला गुंतवणूक करता येईल. म्युच्युअल फंडामध्ये वार्षिक 8-10 टक्के, NPS मध्ये 6-8 टक्के आणि पीपीएफमध्ये 7.1 टक्के वार्षिक रिटर्न मिळतो. त्याच वेळी, सरकारी बॉण्ड्सवर 7 ते 8 टक्के रिटर्न दिला जाऊ शकतो. वेगवेगळ्या बँका FD वर वेगवेगळा व्याज दर दिला जातो,मात्र FD वर 5.25 टक्के ते 7.25 टक्के वार्षिक रिटर्न मिळतो. Investment
लवकर रिटायर होणे
आजकाल देशातील तरुणांमध्ये अर्ली रिटायरमेंट हा चर्चेचा विषय राहिला आहे. वयाच्या 23-24 व्या वर्षी नोकरी सुरू केलेल्यांना 45-50 पर्यंत रिटायर व्हायचे आहे. त्यासाठी लवकरात लवकर Investment सुरू करून ते हे उद्दिष्ट साध्य करू शकतात. कंपाउंडिंगच्या मदतीने 15-20 वर्षांत इतका पैसा उभा करता येईल की लवकर रिटायरमेंट घेतल्या \नंतरही पैशांची कमतरता कधीही भासणार नाही. Investment
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/complete-guide-investing
हे पण वाचा :
HDFC चा ग्राहकांना धक्का !!! सात दिवसांत दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याज दरात वाढ
आपले हरवलेले SBI Card घरबसल्या कसे ब्लॉक करावे हे जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ, आजचे नवे दर पहा
RBI : आता चलनी नोटांवर दिसणार नाही महात्मा गांधींचा फोटो ??? RBI ने म्हंटले कि…