Investment : वाढत्या महागाईमध्ये मुलांच्या भविष्यासाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक !!!

Investment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : आजकाल महागाई वाढतच चालली आहे. या वाढणाऱ्या महागाईमुळे खर्च देखील वाढतोच आहे. याचाच परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला देखील बसतो आहे. या वाढत्या खर्चामुळे आज आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणेही आव्हानात्मक झाले आहे. पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची जितकी काळजी असते तितकीच त्यांना शिक्षणाच्या खर्चाचीही असते.

मात्र योग्य आर्थिक नियोजन केले तर छोट्या छोट्या गुंतवणुकीद्वारे मुलांच्या शिक्षणासाठी मोठी रक्कम जमा करता येऊ शकेल. म्युच्युअल फंडस् मध्ये असे अनेक पर्याय मिळतात जिथे आपल्याला दर महिन्याला कमी रकमेसह दीर्घ कालावधीमध्ये पैसे जमा करता येतील. मात्र, या मार्गातील सर्वात मोठा अडसर ठरेल ती दिवसेंदिवस वाढतच जाणारी महागाई. चला तर मग मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला कशाप्रकारे गुंतवणूक (Investment) करता येईल हे तज्ञां द्वारे समजून घेउयात…

सर्वांत आधी टार्गेट आणि वेळ निश्चित करा

इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर असलेले बळवंत जैन सांगतात की,” कोणत्याही पालकाने सर्वांत आधी पहिले हे तपासले पाहिजे की, आपले मूल आता किती वर्षांचे आहे आणि त्याला उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ शिल्लक आहे.”

समजा, तो फक्त दोन वर्षांचा आहे आणि आपण लवकरच त्यासाठीची तयारी सुरू केली तर अशा परिस्थितीत तो उच्च शिक्षण घेईपर्यंत त्याचे वय 20 वर्षे असेल. अशा प्रकारे, आपल्याकडे पैसे जमा करण्यासाठी 18 वर्षे असतील. आता आपल्या पाल्याला उच्च शिक्षणासाठी किती पैसे लागतील हे ठरवा. यासाठी तुम्हाला दरवर्षीची सरासरी महागाई लक्षात घेऊन खर्चाची अंदाजे रक्कम ठरवावी लागेल. Investment

Why You Should Treat Your Business as an Investment (and 5 Steps to Make It  Pay Off) | Inc.com

महागाई तपासा

ट्रेडस्विफ्ट ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक संदीप जैन सांगतात की, जर तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी मोठा फंड तयार करायचा असेल, तर त्यासाठी महागाईच्या तुलनेत दीर्घकाळासाठी लागणारी अंदाजे रक्कम ठरवा. समजा आत्ता तुमचे मूल 2 वर्षांचे असेल तर 20 व्या वर्षी त्याच्या उच्च शिक्षणासाठी तुम्हांला पैशांची गरज भासेल. आता यासाठी तुमच्याकडे सुमारे 18 वर्षांचा वेळ आहे.

आता असे समजा कि, या 18 वर्षांत महागाईच्या दरात 5.5 टक्के दराने वाढ झाली आहे, त्यामुळे आज खर्च झालेली 25 लाखांची रक्कम 18 वर्षांनंतर सुमारे 1.25 कोटी रुपये होईल. याचा अर्थ आज कोणतेही शिक्षणासाठी होणारा 25 लाखांचा खर्च हा 18 वर्षांनंतर 1.25 कोटी असेल. Investment

Your Money: Build a balanced investment portfolio | The Financial Express

अशा प्रकारे सुरू करा म्युच्युअल फंडची एसआयपी

जर आपण म्युच्युअल फंड SIP मध्ये दरमहा 25,000 रुपये गुंतवले आणि 18 वर्षांसाठी 12 टक्के वार्षिक रिटर्न मिळत असेल, तर मॅच्युरिटीवर एकूण. 1.91 कोटी रुपये तयार होतील. या 18 वर्षांत आपल्याकडून एकूण रक्कम फक्त 54 लाख रुपये गुंतवली जाईल ज्यावर 12 टक्के व्याजदराने ततबल 1.37 कोटी रुपये व्याज म्हणून मिळतील. आता ही रक्कम तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चा बरोबरच इतर आवश्यक खर्चांसाठी वापरता येईल. Investment

Best Mutual Funds In India To Invest In 2022 | Nivesh

Mutual Funds च्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.moneycontrol.com/mutualfundindia/

हे पण वाचा :

PM Kisan मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय नाही करता येणार रजिस्ट्रेशन !!!

PAN Card शी संबंधित ‘हा’ नवा नियम आजपासून लागू !!! त्याविषयी जाणून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर पहा

Bamboo Farming : सरकारच्या मदतीने ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा लाखो रुपये !!!

Bank Holidays : जूनमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा