हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Plan) एखाद्या सुरक्षित योजनेत पैसे गुंतवून जास्तीत जास्त परतावा मिळावा असं कुणाला वाटत नाही? तुम्हालाही वाटत असेलच ना. पण मासिक पगारात आपलं भागत नाही तर गुंतवणूक काय करणार.. असा विचार करून गुंतवणूक टाळत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. तुम्हाला माहित आहे का..? योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याने करोडो रुपयांचा परतावा मिळू शकतो. होय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय. चला तर जाणून घेऊयात कि नेमकी कुठे आणि किती गुंतवणूक केल्यास कोट्यवधींचा फायदा होईल. अधिक माहिती जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
गुंतवणूक म्हणजे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी आत्तापासून केलेली सोय. त्यामुळे आपला पैसे कुठे आणि किती गुंतवावा याबाबत आपल्याला अचूक माहिती असणे आवश्यक आहे. (Investment Plan) इतकेच नव्हे तर आपण ज्या ठिकाणी पैसे गुंतवत आहोत तो मार्ग सुरक्षित आणि जोखीममुक्त असेल याची खात्री करून घेणे गरजेचे असते. त्यामुळे गुंतवणूक करताना कायम दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. आपल्या ठेवीची सुरक्षा आणि आपल्या ठेवीवर किती परतावा मिळेल याचा विचार.
अनेक मंडळी कमी पगार असल्यामुळे गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात. हि गोष्ट माहितीच्या अभावामुळे होते. कारण पगार कमी असला तरीही योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा परतावा मिळवता येतो. साधारणपणे तुम्हाला २० हजार रुपये मासिक पगार असेल तरीही तुम्ही १ कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता. कसा ते जाणून घेऊयात.
कुठे गुंतवाल? (Investment Plan)
भारतात अनेक लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. त्यानुसार जर तुम्हीही या फंडांत गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Lumpsum आणि SIP हे दोन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. यातील Lumpsum प्रकारात तुम्ही एक रकमी पैसे गुंतवू शकता तर SIP या प्रकारात मासिक आधारावर गुंतवणूक करता येते.
उदाहरण देऊन सांगायचं तर, समजा तुम्हाला २०, ००० रुपये पगार असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये मासिक स्वरूपात ४००० रुपयांची गुंतवणूक करू शकता. यावर तुम्हाला १२ ते १५ टक्के परतावा मिळेल.
कोण करू शकतो?
(Investment Plan) सामान्यतः लोक वयाच्या ५० ते ६० वयोवर्षात निवृत्ती घेतात. त्यानुसार साधारणपणे गुंतवणूक सुरू करणाऱ्या व्यक्तीचे वय वर्ष २५ ते ३५ दरम्यान असणे अपेक्षित आहे. वेळेआधी निवृत्ती घेणाऱ्या व्यक्तीस त्यानुसार गुंतवणुकीचे नियोजन करावे लागते. ज्यासाठी आर्थिक तज्ञांचा सल्ला लाभदायी ठरतो.
किती कालावधीत किती परतावा मिळेल?
वर दिलेल्या उदाहरणानुसार, जर तुम्ही प्रतिमहिना ४००० रुपये गुंतवत असाल तर सरासरी १५ टक्के परतावा तुम्हाला मिळेल. म्हणजे पुढील २५ वर्षांत १.३ कोटी रुपये इतका निधी तयार होतो. (Investment Plan)