हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिस (Post Office) किंवा पोस्ट पेमेंट बँकेकडून लोकांसाठी अनेक लहान बचत योजना चालविल्या जातात. या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आणि टॅक्स फ्री आहेत. तसेच यामध्ये आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट (FD) पेक्षा जास्त व्याज देखील मिळेल.
तर आज आपण यापैकीच एक योजना असलेल्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेबाबत माहिती जाणून आहोत. यामध्ये पैसे गुंतवून आपल्याला 6.8% व्याज मिळेल. हे लक्षात घ्या कि, हा व्याज दर देशातील सर्व मोठ्या बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) पेक्षा जास्त आहे. देशातील अनेक मोठ्या बँकांकडून FD वर जास्तीत जास्त 5.50% टक्के व्याज दिले जाते. त्याचबरोबर NSC मध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80 C अंतर्गत सूटही मिळते. Post Office
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) चे फायदे जाणून घ्या
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मधील गुंतवणूकीवर दरवर्षी 6.8% व्याज मिळते. यामध्ये वार्षिक आधारावर व्याज मोजले जाते, मात्र व्याजाची रक्कम ही गुंतवणूकीच्या कालावधीनंतरच दिली जाते. Post Office
किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील
Post Office मध्ये NSC योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हे खाते एका अल्पवयीन मुलांच्या नावे आणि 3 प्रौढांच्या नावावर देखील उघडले जाऊ शकते. तसेच दहा वर्षांच्या वयाच्या अल्पवयीन मुलांच्या नावावर देखील पालकांच्या देखरेखीखाली हे खाते उघडता येते. NSC चा लॉक-इन पिरिअड 5 वर्षांचा आहे. म्हणजेच यामध्ये 5 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. तसेच याअंतर्गत, आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत आपण 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर टॅक्स वाचवू शकता. तुम्ही NSC मध्ये कोणतीही रक्कम गुंतवू शकता. कोणतीही जास्तीच्या गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=90
हे पण वाचा :
Mutual Fund द्वारे अशा प्रकारे गुंवणूक करून मिळवून भरपूर रिटर्न !!!
Hyundai Tucson 2022 : ह्युंदाईची नवी Tucson बाजारात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत
Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त !!! नवीन दर पहा
Business : ‘हा’ व्यवसाय सुरू करून दर महिना मिळवा लाखो रुपये !!!
Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी वाईट बातमी !!! MCLR वाढल्याने कर्ज महागले