Kisan Vikas Patra च्या गुंतवणूकदारांना मिळणार दुप्पट फायदा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kisan Vikas Patra : केंद्र सरकारकडून अनेक लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली ​​आहे. जी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) असेल. या तिमाहीसाठी व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सपर्यंतची वाढ केली गेली आहे. ज्या लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली ​​आहे त्यामध्ये किसान विकास पत्राचा देखील समावेश आहे. हे लक्षात घ्या कि, सरकारकडून ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठीचा व्याजदर 7.4% वरून 7.6% तर किसान विकास पत्रावरील व्याज दर 6.9% वरून 7% पर्यंत वाढवण्यात आला ​​आहे.

Small saving grace for households - The Hindu

Kisan Vikas Patra मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना डबल फायदा मिळणार आहे. आता त्यांना 6.9 टक्क्यांऐवजी 7 टक्के व्याज दर मिळेल. तसेच याआधी त्याच्या मंच्युरिटीचा कालावधी 124 महिन्यांचा होता, जो बदलून 123 महिने करण्यात आलेला आहे. यामध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित राहण्या बरोबरच त्यावर चांगला रिटर्नही मिळेल. ज्यामुळे मोठ्या संख्येने लोकं यामध्ये गुंतवणूक करत आहेत.

Kisan Vikas Patra: निवेश को दोगुना करने की गांरटी देती है पोस्ट ऑफिस की यह स्कीम, जानिए क्या है प्रोसेस - Get Your Investment Doubled In Kisan Vikas Patra Scheme Know Full

कोणाला गुंतवणूक करता येईल ???

हे जाणून घ्या कि, 18 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या कोणत्याताही भारतीय नागरिकाला Kisan Vikas Patra मध्ये गुंतवणूक करता येईल. या योजनेमध्ये फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. तसेच यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा देखील नाही. किसान विकास पत्रामध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन व्यक्तीचे खाते देखील उघडले जाऊ शकते, मात्र हे खाते कोणत्याही प्रौढ व्यक्तीलाच काढावे लागेल.

Kisan Vikas Patra know money doubled in 118 month - News Nation

टॅक्स सूट मिळणार नाही

मात्र Kisan Vikas Patra च्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स मध्ये सूट दिली जाणार नाही. यामध्ये गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज यावर गुंतवणूकदाराच्या टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्स भरावा लागतो. तसेच, या योजनेत टीडीएस कापला जात नाही.

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

मॅच्युरिटी आधी पैसे काढता येतात

जर एखाद्याने Kisan Vikas Patra खरेदी केल्याच्या 1 वर्षाच्या आत परत केले तर त्याला व्याज मिळणार नाही. तसेच त्यासाठी त्याला दंड देखील भरावा लागेल. त्याच बरोबर गुंतवणूकदाराने अडीच वर्षांनी पैसे काढल्यास त्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही आणि गुंतवणूकदाराला पूर्ण व्याज देखील दिले जाईल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.unionbankofindia.co.in/english/kvp.aspx

हे पण वाचा :

HDFC चा ग्राहकांना झटका !!! होम लोनवरील व्याजदरात केली 0.50 टक्क्यांनी वाढ

Repo Rate वाढल्याचा पर्सनल-एज्युकेशन लोनवर कसा परिणाम होईल ते समजून घ्या

Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा

Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!! कसे ते जाणून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाली वाढ, पाहा ताजे दर