हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्ध भारतीय संघ दबावात असताना विकेट किपर बॅट्समन रिषभ पंत ने आक्रमक खेळी करत धडाकेबाज शतक झळकावले. रिषभ पंतची खेळी एवढी वादळी होती की त्या वादळात इंग्लिश गोलंदाज अक्षरशः उडून गेले. दरम्यान जगभरातून रिषभच्या खेळीचं कौतुक होत असताना पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम उल हक ने देखील रिषभ पंतचे तोंड भरून कौतुक केलं.
ऋषभ पंत अतिशय़ उत्तम खेळाडू आहे. तो जेव्हा कधी फलंदाजी करतो तेव्हा आपण सेहवागलाच डाव्या हाताने खेळताना पाहत असल्याचा भास होत असल्याचं इंझमामने म्हटलं आहे. कितीही दबाव असला तरी फरक पडत नाही हा सेहवागचा गुणधर्म पंतमध्येही असल्याचं इंझमामने म्हटलं आहे.
मी सेहवागसोबत खेळलो आहे आणि त्यालादेखील इतर गोष्टींचा फरक पडत नव्हता. जेव्हा तो फलंदाजी करायचा तेव्हा खेळपट्टी कशी आहे किंवा समोरची गोलंदाजी कोणत्या पद्धतीची आहे याचा त्याला फरक पडत नव्हता. तो आपले शॉट खेळायचा. सेहवागनंतर मी पहिल्यांदाच असा खेळाडू पाहिला आहे ज्याला इतर गोष्टींचा काही फरक पडत नाही,” असं इंझमामने म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’