हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 मध्ये आज चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जोरदार मुकाबला होणार आहे. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खूप दिवसांनी चाहत्यांना क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी आजचा सामना खूपच भावनिक असेल.
दोन यष्टीरक्षक कर्णधार असलेले महेंद्र सिंग धोनी आणि ऋषभ पंत यांच्या रणनितीकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून आहे.ऋषभ पंतकडे महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातंय. तर महेंद्रसिंग धोनी आदर्श असल्याचं ऋषभ पंतने वारंवार सांगितलं आहे.
चेन्नईच्या संघात अंबाती रायुडू, फाफ डुल्पेसी, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी अशा आक्रमक फलंदाजांची फौज आहे. तर जडेजा, सॅम करण, मोईन अली आणि ब्रावो असे अष्टपैलू संघाचे संतुलन राखतात.
तर दुसरीकडे दिल्लीचा संघ खूपच मजबूत वाटतो. रिषभ पंत शिखर धवन स्टीव्ह स्मिथ मार्कस स्टोईनीस असे मातब्बर फलंदाज असल्याने चेन्नईच्या गोलंदाना अचूक गोलंदाजी करून दिल्लीला रोखावे लागेल. तसेच दिल्ली कडे कगीसो राबाडा, अक्षर पटेल, नॉरचे, इशांत शर्मा अशी मजबूत गोलंदाजी देखील आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group